आरसीबी संघ(फोटो-सोशल मीडिया)
RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ स्पर्धा संपून काही आठवडे उलटून गेले आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतिहास घडवला होता. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. आरसीबी संघाने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा दणदणीत पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना खूप रोमांचक झाला होता. या अंतिम सामन्याने अनेक विक्रम खालसा केले आहेत. हा सामना सर्वाधिक प्रेक्षकांनी लाईव्ह पाहिला आहे.
हेही वाचा : IND vs ENG: पहिल्या कसोटी पूर्वी तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण; ‘या’ दोन दिग्गजांची उपस्थिती, पाहा फोटो..
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याने एक विक्रम रचला होता. अंतिम सामना हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला आहे. एकूणच, विजेतेपदाच्या सामन्याच्या टीआरपीने खास इतिहास रचलाया आहे. आता आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामना हा टी २० च्या इतिहासातील सर्वाधिक टीआरपी असलेला सामना ठरला आहे.
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या १८ व्या हंगामातील विजेतेपदाच्या सामन्याने एका वेगळ्या प्रकारचा विक्रम नोंदवला आहे. आकडेवारी लक्षात घेता हा एक विक्रम असल्याचे लक्षात येते. टीव्हीबद्दल सांगायचे झालयास आयपीएल २०२५ चा अंतिम सामना १६९ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. त्यानुसार, तो टीव्हीवर सर्वाधिक पाहिला जाणारा टी२० सामना ठरला आहे.
169 MILLION PEOPLE WATCH RCB vs PBKS FINAL ON TV 🥶
– Historic numbers in Cricket. pic.twitter.com/WLIAKJe8ip
— Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2025
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने ३५ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची छोटेखाणी पण महत्त्वाची खेळी खेळली होती. त्याच वेळी, कर्णधार रजत पाटीदारने २६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १५ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या होत्या.
हेही वाचा : IND vs ENG : ‘विराटविरुद्ध न खेळणे निराशाजनक असेल..’, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचे कसोटीपूर्वी मोठे विधान
धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जला जिंकण्यासाठी १९१ धावांची गरज होती. परंतु, त्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून १८४ धावाच करता आल्या. त्यानुसार, आरसीबीने विजेतेपदाचा सामना ६ धावांनी जिंकला आणि पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद जिंकले. त्यानंतर देशभरातील आरसीबी चाहत्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आला.