Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? संजय राऊतांचा मोठा दावा; मोदींच्या जागी कोण येणार, राऊतांनी दिले संकेत

Sanjay Raut : मोदी सरकार सहा महिन्यांत कोसळणार आणि पंतप्रधान मोदींच्या जागी नवे नेतृत्व येणार, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यासोबतच महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकरी मदत आणि सत्ताधाऱ्यांच्या खर्चावरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

  • By विवेक
Updated On: Oct 18, 2026 | 02:52 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार?
  • संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण
  • दुष्काळावरून फडणवीस सरकारला घेरलं
 

Sanjay Raut : देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून आंदोलनाची तयारी सुरू असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारबाबत मोठा दावा केला आहे. पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी नवं नेतृत्व येईल, असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात असल्याची चर्चा आहे. आता संजय राऊत यांनीही या दाव्याला दुजोरा देत आपली भूमिका मांडली आहे.

राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशभरातून विरोधी पक्ष तसेच इतर विद्यार्थी संघटना यांच्याकडून केंद्रीय सरकारवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना राऊतांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा खलबल उडाली आहे.

मोदींच्या जागी कोण? संजय राऊत म्हणाले…

मोदींच्या जागी कोणता नेता पंतप्रधान होणार, याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नाव सांगू शकतो, मात्र सध्या सांगणार नाही, असं सूचक विधान केलं. ‘रेझिम चेंज म्हणजे रेझिम चेंज’, असं म्हणत त्यांनी केंद्रातील नेतृत्वबदलाच्या चर्चेला आणखी हवा दिली.

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…

दुष्काळावरून फडणवीस सरकारला घेरलं

दुसरीकडे, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरूनही संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘आम्ही 1972 चा दुष्काळ पाहिला आहे. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आजची परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर आहे,’ असं ते म्हणाले. कोकणात यापूर्वी कधी दुष्काळ जाहीर झाला नव्हता, असं सांगत त्यांनी परिस्थितीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधलं.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्याला सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र, शेतकऱ्यांच्या हातावर केवळ पाच हजार रुपये ठेवले जात असल्याची टीका त्यांनी केली.

सत्ताधाऱ्यांच्या पैशांवरही सवाल

निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप करत राऊत यांनी भाजप, शिंदे गट आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 25 ते 30 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये भेटवस्तू आणि पैशांचं वाटप होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांकडे एवढा पैसा येतो कुठून, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी राऊत यांनी केली. ठेकेदारांच्या माध्यमातून राज्याची लूट झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.

एकीकडे केंद्रातील नेतृत्वबदलाची चर्चा, तर दुसरीकडे दुष्काळावरून राज्य सरकारवर हल्लाबोल, अशा दुहेरी मुद्द्यांमुळे संजय राऊत यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांनी मोदी सरकारबाबत काय दावा केला?

    Ans: पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी नवे नेतृत्व येईल, असा दावा राऊत यांनी केला आहे.

  • Que: मोदींच्या जागी कोण पंतप्रधान होणार, याबाबत संजय राऊत काय म्हणाले?

    Ans: नव्या नेतृत्वाचे नाव सांगू शकतो, पण सध्या सांगणार नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

  • Que: महाराष्ट्रातील दुष्काळावरून संजय राऊत यांनी सरकारवर काय आरोप केले?

    Ans: दुष्काळाचा सामना करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांची गरज असल्याचा दावा करत राऊत यांनी शेतकऱ्यांना अपुरी आर्थिक मदत मिळत असल्याची टीका केली.

Web Title: Sanjay raut statement modi government collapse vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • PM Narendra Modi
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला
1

Ambadas Danve : ‘भाजपने दिलं तेच घ्यावं लागतं’; अंबादास दानवेंचा शिंदेसेना-राष्ट्रवादीला जोरदार टोला

Mark Carney: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनडा दौरा अन् अल्बर्टातील सार्वमत; मार्क कार्नी यांच्या मोठ्या खेळीमागे काय आहे कारण?
2

Mark Carney: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनडा दौरा अन् अल्बर्टातील सार्वमत; मार्क कार्नी यांच्या मोठ्या खेळीमागे काय आहे कारण?

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!
3

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
4

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.