Mohammed Siraj: इंग्लंडविरुद्ध DSP सिराजच सर्वोत्तम! 5 सामन्यात 23 विकेट्स; 3 बॉल्समध्ये संपवला 'साहेबांचा खेळ'
India Vs England 5th Test: आज ओव्हल मैदान येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी सिरीजमधील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने अतुलनीय खेळ करत इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला आहे. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताला विजयासाठी ६ विक्ट्सची गरज होती. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी तर अत्यंत भेदक आणि अचूक गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. आजचा सामना आणि आधी झालेले ४ सामन्यात मोहम्मद सिराजने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तसेच मी कोणताही सामना जिंकवू शकतो असे त्याने म्हटले आहे.
ओव्हलच्या सामन्यात मोहम्मद सिराजने कमल केली आहे. शेवटच्या डिव्हसी भारताला विजयासाठी ४ विक्ट्सची आवश्यकता होती. दरम्यान आज गोलंदाजी करताना सिराजने भेदक गोलंदाजी करत ४ पैकी ३ विकेट्स पटकावल्या. पूर्ण सामन्यात मोहम्मद सिराजने एकूण ९ विकेट्स घेतल्या. त्यातल्या ५ त्याने दुसऱ्या डावात घेतल्या. मोहम्मद सिराजने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.
मोहम्मद सिराजच ठरला सर्वोत्तम
अँडरसन-तेंडुलकर या सिरीजमध्ये भारताचे कसोटी सामन्यांसाठीचे नेतृत्व हे शुभमन गिलकडे सोवपण्यात आले होते. पहिला सामना भारत पराभूत झाला. तर दुसऱ्या सामन्यात भारत विजयी झाला.तिसऱ्या सामन्यात इंग्लड विजयी तर चौथ्या सामना टाय झाला. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय आवश्यक होता. सिराजने भेदक गोलंदाजी करत भारताला विजय प्राप्त करून दिला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज हा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. मोहम्मद सिराजने ५ सामन्यांमध्ये एकूण २३ विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्यांदाच एका भारतीय गोलंदाजाने टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच सामना संपल्यावर ‘मी कोणतीही मॅच जिंकून देऊ शकतो’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
For his relentless bowling display and scalping nine wickets, Mohd. Siraj bags the Player of the Match award in the 5th Test 👏👏 Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#TeamIndia | #ENGvIND | @mdsirajofficial pic.twitter.com/GyUl6dZWWp — BCCI (@BCCI) August 4, 2025
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा फायदा
भारताने इंग्लंडविरुद्धची सिरीज २-२ अशी बरोबरीत सोडवली असल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत फायदा झाला आहे. सध्या भारत या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. तर पराभव झाल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने त्यांचे ३६ गुण झाले आहेत. तर टक्केवारी १०० आहे. तर दुसऱ्या स्थानी श्रीलंका आहे.