भारताचा इंग्लंडवर ६ धावांनी दणदणीत विजय (bcci)
India Vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ वा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडच्या ओव्हलमध्ये हा सामना सुरु आहे. आजचा सामना हा सिरीजमधील शेवटचा सामना होता. या सामन्यात भारतीय संघव्हा विजय झाला आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक गोलंदाजी करत विजयश्री खेचून आणली आहे.
भारताने हा अटीतटीचा सामना ६ धावांनी जिंकलेला आहे. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा त्यांनी भेदक गोलंदाजी केली आहे. भारताने हा सामना जिंकून सिरीज अनिर्णित ठेवली आहे. २-२ अशी ही सिरीज राहिली आहे.
5TH Test. India Won by 6 Run(s) https://t.co/1X8XpuKSme #ENGvIND #5thTest
— BCCI (@BCCI) August 4, 2025
जखमी असून ख्रिस वोक्स मैदानात
इंग्लंडचा स्टार गोलंदाज ख्रिस वोक्स सामन्यादरम्यान जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले होते. मात्र जखमी झालेला असून देखील ख्रिस वोक्स हा आपल्या संघासाठी मैदानात उतरला होता. हाताला फ्रॅक्चर असून देखील वोक्स मैदानात खेळण्यासाठी उतरला होता.
सिरीजमधील शेवटच्या संयत मोहम्मद सिरीजने ५ बळी घेत इंग्लंडच्या संघाला रोखून धरले. प्रसिद्ध कृष्णाने देखील ४ विकेट्स घेतल्या आहेत. तर आकाश दीपने १ विकेट घेतली. इंग्लंडने ३७४ धावांचा पाठलाग करताना सर्व बाद ३६८ धावा केल्या. कालचा दिवसात इंग्लंडने ६ बाद ३३६ धावा केल्या होत्या.मात्र पाऊस आणि बॅड लाईट्स यामुळे सामना थांबवण्यात आला होता.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा फायदा
भारताने इंग्लंडविरुद्धची सिरीज २-२ अशी बरोबरीत सोडवली असल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत फायदा झाला आहे. सध्या भारत या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. तर पराभव झाल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने त्यांचे ३६ गुण झाले आहेत. तर टक्केवारी १०० आहे. तर दुसऱ्या स्थानी श्रीलंका आहे.
री ब्रूकने केला हा मोठा पराक्रम
यासह इंग्लंडने सामन्यात शानदार पुनरागमन केले. ब्रूक आता टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तिसरा इंग्लिश फलंदाज बनला आहे. तो टीम इंडियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा पहिला इंग्लिश फलंदाज ठरला आहे, त्याने भारताविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात ८० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर बेन डकेट दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने ८८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.