फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Dubai pitch report for Pakistan vs Oman match : आशिया कप 2025 चा आज चौथा सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेची विजयाने केली आहे. तर आज पाकिस्तानचा पहिला सामना होणार आहे. पाकिस्तान आणि ओमान संघ आजपासून आशिया कप २०२५ मोहिमेला सुरुवात करत आहेत. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी दुबईमध्ये भारत आणि यूएई यांच्यात एक सामना खेळला गेला आहे, जो कमी धावांचा होता. या सामन्यातही असेच काहीसे दिसून येते, कारण ओमानची फलंदाजी तितकीशी मजबूत नाही.
सर्व संघाचे तीन साखळी सामने खेळवले जाणार आहेत, यामध्ये कमीतकमी दोन सामने संघाने जिंकणे गरजेचे आहेत. पाकिस्तानचा पुढील सामना हा भारताविरुद्ध होणार आहे. त्याआधी पाकिस्तानच्या संघाला ओमानविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. जर त्यांनी प्रथम फलंदाजी केली तर हा सामना नक्कीच कमी धावांचा असण्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी, येथील पिचचा मूड कसा असेल आणि कोणाला फायदा होण्याची शक्यता आहे हे जाणून घ्या. पिच रिपोर्टवर एक नजर टाका –
२००९ पासून दुबई क्रिकेट स्टेडियमवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात आहेत. आतापर्यंत येथे ९४ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४६ सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ४८ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की येथे नाणेफेकीला फारसे महत्त्व नाही, कारण तुम्ही प्रथम फलंदाजी करा किंवा नंतर, जिंकण्याची शक्यता जवळजवळ समान आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४४ आहे. १२२ धावा हा येथील कोणत्याही फलंदाजाचा सर्वोच्च धावसंख्या आहे, जो विराट कोहलीने गेल्या टी-२० आशिया कपमध्ये केला होता. येथे प्रति षटक ७.३१ धावा या दराने धावा केल्या जातात, तर प्रति विकेट सरासरी धाव २१.०६ आहे. याशिवाय, येथे वेगवान गोलंदाजांना ६४ टक्के बळी मिळतात आणि फिरकीपटूंना ३६ टक्के बळी मिळतात.
Match 4 ⚔️
Making their first appearance at the #DPWorldAsiaCup2025, Pakistan & Oman will brawl at the Dubai International Stadium. 🥊#PAKvOMA #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/NLDEEDOoTy
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 12, 2025
दुबईच्या हवामान अहवालाबाबत हे अगदी स्पष्ट आहे की येथे पावसाची एक टक्काही शक्यता नाही. हवामान उष्ण राहणार आहे. दुपारी तापमान ४१ अंशांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे, तर सामन्याच्या वेळीही हवामान उष्ण राहील आणि तापमान ३५ अंशांच्या आसपास राहील.