फोटो सौजन्य - BCCI
भारताच्या संघामध्ये पहिला सामना सुरु होण्याच्या आधी एक बदल करण्यात आला आहे, तो म्हणजेच भारताच्या संघामध्ये 18 खेळाडूंऐवजी 19 खेळाडू सामील करण्यात आले. भारतीय संघ हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली 19 खेळाडूसह ही इंग्लडविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतासाठी इंग्लडचे मोठे आव्हान असणार आहे. भारताच्या संघामध्ये हर्षित राणाला संघामध्ये सामील करण्यात आले आहे. आता भारताचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. टीम इंडीयाची पहिल्या सामन्यात प्लेइंग ११ कशी असु शकते यासंदर्भात सविस्तर सांगणार आहोत.
२००७ पासून भारतीय संघाने इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत, नवीन शुभमन गिल इंग्लंडमध्ये इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. हेडिंग्ले कसोटीपूर्वी, चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की या सामन्यात भारतीय संघाचा प्लेइंग ११ कोणता असू शकतो. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करू शकतो. केएल राहुल त्याला साथ देऊ शकतो. नंबर ३ च्या स्थानासाठी ३ दावेदार आहेत साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन आणि करुण नायर यांच्यामध्ये शर्यत तिसऱ्या स्थानासाठी लागली आहे. तथापि, ८ वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या करुण नायरवर विश्वास ठेवता येईल.
कर्णधार शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पंतने याचे संकेत दिले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणारा आणि आयपीएल २०२५ मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा साई सुदर्शन सहाव्या क्रमांकावर मैदानात येऊ शकतो.
IND vs ENG : मुकेश कुमार कोच गौतम गंभीरवर नाराज? पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला – कर्मा आपली वेळ…
अष्टपैलू रवींद्र जडेजाला ७ व्या क्रमांकावर खेळवता येईल. याशिवाय, भारतीय संघात ४ वेगवान गोलंदाजांना स्थान दिले जाऊ शकते. यामध्ये शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश असू शकतो. शार्दुल फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. यामुळे भारतीय फलंदाजीमध्ये खोली वाढेल.
भारताच्या संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले, अनेक खेळाडू हे भारतीय संघासाठी पदार्पण करणार आहेत. भारतीय संघामधील विश्वचषक विजेता अर्शदीप सिंह हा कसोटी क्रिकेटमध्ये या मालिकेत पदापर्ण करताना दिसणार आहे. भारताच्या संघासाठी त्याला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे आणि त्याचे संघामध्ये स्थान पक्के करण्याची वेळ आहे. सिराजला चॅम्पियन ट्राॅफीमधुन वगळ्यात आले होते. या मालिकेत त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.