Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs SL: हा तर कहरच! हॅरी ब्रुकने द्विशतक ठोकलं पण पवन रत्नायकेने खेळच बिघडवला; श्रीलंकेने 430 धावा चोपून इंग्लंडला लोळवलं

ENG vs SL Sri Lanka Beat england Chase 430 Runs in ODI: इंग्लंडविरुद्धच्या ट्राय सीरीजमध्ये श्रीलंकेने इंग्लंडचा दारुण पराभव करण्यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 23, 2026 | 03:08 PM
Sri Lanka Beat england

Sri Lanka Beat england

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडला श्रीलंकेने दिला मोठा धक्का
  • ४३० धावांचं लक्ष्य पार करत रचला नवा इतिहास
  • श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय

ENG vs SL: पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या ट्राय सीरीजमधील तिसऱ्या सामन्यात एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. रावळपिंडी स्टेडियमवर श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना , कर्णधार हॅरी ब्रूकच्या २०२ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत ४२९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ४३० धावांचे मोठे लक्ष्य गाठले आणि इंग्लंडचा २ विकेट्सने पराभव केला. पवन रत्नायकेच्या १३० आणि दसुन शनाकाच्या ९७ धावांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेला हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. (Sri Lanka Beat england Chase 430 Runs in ODI)

IND vs NZ: पहिल्या सामन्यात भारताची बाजी! आता न्यूझीलंड घेणार पराभवाचा बदला? दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे?

हॅरी ब्रुकच्या द्विशतकाच्या मदतीने इंग्लंडने उभारला धावांचा डोंगर

नाणेफेक गमावून इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंडने सुरुवातीपासूनच धावांचा वेग कायम ठेवला. टॉम बँटनने संघाला भक्कम ५० धावांचे योगदान दिले, तर जो रूटने ६९ धावांची भर घालून डावाला आधार दिला. दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार हॅरी ब्रुकने सूत्रे हाती घेतली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमकपणे धावा केल्या.ब्रुकने २०२ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत ४२९/४ अशी मोठी धावसंख्या उभारली.

पवन रत्नायकेच्या शतकाने श्रीलंकेच्या आशा जिवंत ठेवल्या

४३० धावांचे मोठे लक्ष्य गाठताना, अविष्का फर्नांडोच्या खेळीने श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. तो शतक पूर्ण करण्यापासून केवळ तीन धावा दूर राहिला आणि ९७ धावांवर बाद झाला. त्यानंतर पवन रत्नायकेने सूत्रे हाती घेतली आणि १३० धावांची शानदार खेळी केली. त्याच्या फलंदाजीमुळे श्रीलंका सामना जिंकण्याच्या आशा जिवंत राहिल्या. रत्नायकेनंतर दासुन शनाकानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. शतक हुकल्याने ९७ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्याच्या बाद होण्याने श्रीलंकेच्या अडचणी वाढल्या. संघाला विजयासाठी वेगाने धावा करणे आवश्यक होते आणि विकेट्स सातत्याने पडत होत्या.

जनिथ लियानागेने शेवटच्या क्षणी विजय केला निश्चित

सामन्याच्या अंतिम टप्प्यात जनिथ लियानागे श्रीलंकेचा विजयाचा नायक ठरला. त्याने अवघ्या २७ चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावांची खेळी करून इंग्लंडच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. त्याच्या आक्रमक फलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले. अखेर श्रीलंकेने ४९.५ षटकांत ८ विकेट्स गमावून ४३० धावा करत एक ऐतिहासिक विजय नोंदवला.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग

  • दक्षिण आफ्रिका – ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४३५ धावा (जोहान्सबर्ग, २००६)
  • श्रीलंका – इंग्लंड विरुद्ध ४३० धावा (रावळपिंडी, २०२६)
  • भारत – वेस्ट इंडिज विरुद्ध ४०६ धावा (गुवाहाटी, २०२६)
  • नेदरलँड्स – वेस्ट इंडीज विरुद्ध ३७५ धावा (सुपर ओव्हरमधील विजय, हरारे, २०२३)
  • दक्षिण आफ्रिका – ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३७२ धावा (डर्बन, २०१६)
IND vs NZ: अभिषेक-सॅमसनची जोडी एकदम कडक! न्यूझीलंडच्या मैदानात घातला धुमाकूळ, रोहित-राहुलचा विक्रम स्वाहा

Web Title: Eng vs sl sri lanka chase 430 runs beat england odi record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • ENG vs SL
  • Harry Brook
  • PAK vs SL

संबंधित बातम्या

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114  चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!
1

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114 चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.