आशिया कप २०२५ च्या तिसऱ्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर धावांचे १३४ लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेकडून कामिंडु मेंडिसने सर्वाधिक ५० धावा काढल्या तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील तिसऱ्या सुपर ४ सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांनी सुपर-४ मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला असून, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळू शकते.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुपर चारचा महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. अबू धाबीमधील खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते, जिथे फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळते.
श्रीलंकेचा कमकुवत मधला क्रम चिंतेचा विषय आहे. आशिया कपच्या सुरुवातीच्या सुपर ४ सामन्यांमधील पराभवातून सावरत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ मंगळवारी आशिया कपच्या या महत्त्वाच्या टप्प्यात आमनेसामने येतील.