Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114 चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

Harry Brook : हॅरी ब्रूकने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात 114 चेंडूंत द्विशतक पूर्ण करत सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम केल्याचे वृत्त आहे. त्याच्या 202 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 429 धावा केल्या.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 06:46 PM
Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या ११४ चेंडूंत वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या ११४ चेंडूंत वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

Follow Us
Follow Us:
  • गिलच्या विक्रमाला मागे सारले
  • ब्रूक आणि रूटची शतकी भागीदारी
  • इंग्लंडची 400 धावांची आठवी मजल
 

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने (Harry Brook) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे (ODI) सामन्यात ऐतिहासिक खेळी करत विश्वविक्रमाला गवसणी घातली. ब्रूकने अवघ्या 114 चेंडूंत द्विशतक पूर्ण करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याच्या आक्रमक खेळीच्या जोरावर इंग्लंडने निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 429 धावांचा डोंगर उभारला.

या खेळीसह ब्रूक इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच ग्लेन मॅक्सवेलनंतर सलामीला न उतरता द्विशतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.

गिलच्या विक्रमाला मागे सारले

आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत शुभमन गिलचा विक्रम ब्रुकने मोडीत काढला असून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. गिलने याच वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध 117 चेंडूंत द्विशतक पूर्ण केले होते, तर इशान किशनने बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूंत हा पराक्रम केला होता.

वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 14 वेळा फलंदाजांनी द्विशतक झळकावली आहेत. भारताचा रोहित शर्मा या प्रकारात सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम राखतो. त्याने 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्स मैदानावर 264 धावांची खेळी केली होती.

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…

ब्रूक आणि रूटची शतकी भागीदारी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला टॉम बँटन आणि बेन डकेट यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 80 चेंडूंत 74 धावांची भागीदारी केली. बँटनने 51 चेंडूंत 9 चौकारांसह 50 धावा केल्या. त्यानंतर डकेट 29 धावांवर बाद झाला. इंग्लंडची धावसंख्या 85 असताना संघाने दोन गडी गमावले होते.

यानंतर कर्णधार ब्रूकने जो रूटच्या साथीने डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 चेंडूंत 159 धावांची भागीदारी केली. रूटने 66 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 69 धावा केल्या.

रूट बाद झाल्यानंतर ब्रूकने विल जॅक्ससोबत आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी अवघ्या 77 चेंडूंत 185 धावा जोडल्या आणि इंग्लंडला 429 धावांपर्यंत पोहोचवले.

ब्रूकने 116 चेंडूंत 10 चौकार आणि 21 षटकारांच्या मदतीने 202 धावा केल्या. विल जॅक्सने 30 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेने दोन, तर असिथा फर्नांडो आणि जनिथ लियानागे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Asian Para Games : हाय जंपमध्ये भारताचा क्लीन स्वीप! तिन्ही पदके भारताच्या नावावर, शैलेशची सुवर्ण कामगिरी

इंग्लंडची 400 धावांची आठवी मजल

वनडे क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा गाठण्याची इंग्लंडची ही आठवी वेळ ठरली आहे. भारताने हा टप्पा सर्वाधिक 9 वेळा गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेने 8 वेळा, तर ऑस्ट्रेलियाने 3 वेळा वनडे सामन्यात 400 धावांचा टप्पा पार केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हॅरी ब्रूकने किती धावा केल्या?

    Ans: ब्रूकने ११६ चेंडूंत १० चौकार आणि २१ षटकारांच्या मदतीने २०२ धावा केल्या.

  • Que: हॅरी ब्रूकसोबत विल जॅक्सने किती धावा केल्या?

    Ans: विल जॅक्सने ३० चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ६६ धावा केल्या.

  • Que: इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध किती धावा केल्या?

    Ans: इंग्लंडने ५० षटकांत चार गडी गमावून ४२९ धावा केल्या.

Web Title: Harry brook fastest odi double century england vs sri lanka meta keywords rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • England cricket
  • Harry Brook
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

ENG Vs PAK: पाकड्यांची दाणादाण अन् Joe Root रचणार ‘हा’ रेकॉर्ड; ठरणार इंग्लंडचा पहिला फलंदाज
1

ENG Vs PAK: पाकड्यांची दाणादाण अन् Joe Root रचणार ‘हा’ रेकॉर्ड; ठरणार इंग्लंडचा पहिला फलंदाज

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन
2

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.