ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी २० विश्वचषकाची (ICC T20 World cup) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १६ ऑक्टोबर पासून विश्वचषक सामान्यांना सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान सोबत रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार असून त्यांच्यात होणारे रोमांचकारी क्रिकेट सामने पाहण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
यंदाचे टी २० विश्वचषकाचे सामने प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहेत. मल्टिप्लेक्स कंपनी INOX ने ICC सोबत विश्वचषका संदर्भात करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतातील सर्व सामने आपल्या आता थिएटरमध्ये दाखवणार आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनलचे सामनेही थिएटरमध्ये दाखवण्यात येण्याची विशेष सोय करण्यात आली आहे.
INOX कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील जवळपास २५ शहरांमध्ये जिथे INOX चे स्क्रीनिंह होतात. त्या ठिकाणी टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्यात येईल. तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारताचे सामने मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत.
टी २० विश्वचषक २०२२ मध्ये भारताचे वेळापत्रक :