
photo- social media
ऑलिम्पिक शूटिंग रेंजवर झालेल्या अंतिम सामन्यात ईशा सिंगने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि अचूक नेमबाजी करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला. पहिल्या तीन सिरीजमध्ये तिने सातत्यपूर्ण उत्कृष्ट गुण मिळवत मोठी आघाडी घेतली. अवघ्या २१ वर्षीय ईशा सिंगने अंतिम फेरीत ४३ गुणांची कमाई करत नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम कोरियाच्या किम ये-जीच्या नावावर होता. या स्पर्धेत
जर्मनीच्या माजी विश्वविजेत्या डोरीन वेनेकॅम्पने रजत पदक जिंकले तर बल्गेरियाच्या मिरोस्लावा मिंचेवाने कांस्यपदक जिंकले. ईशाने दोन वर्षांपूर्वी बाकू येथे कोरियाच्या किम ये-जीने केलेला ४२ गुणांचा विश्वविक्रम मोडला. याशिवाय तिने यांग जिनचा ४१ गुणांचा ज्युनियर विश्वविक्रमही मागे टाकला. तर, विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन यांग जिनला या स्पर्धेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
ईशा सिंगने क्वालिफिकेशनच्या प्रिसिजन राऊंडमध्ये २९३ आणि रॅपिड फायर राऊंडमध्ये २९४ गुण मिळवले. एकूण ५८७ गुणांसह ती चौथ्या स्थानावर राहिली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. या विजयामुळे तिने यावर्षी रोम येथे होणाऱ्या ISSF विश्वचषक अंतिम स्पर्धेसाठीही थेट पात्रता मिळवली.
A day of World Records for Bharat! At the ISSF World Cup in Munich, Esha Singh scripted history by winning Gold in the Women’s 25m Pistol event with a phenomenal World Record score of 43. pic.twitter.com/1Skkv3Vv5d — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) May 27, 2026
THE WORLD RECORD BREAKING MOMENT! 🤩 – Esha Singh won the ISSF World Cup 🏆🔥pic.twitter.com/fi0Mn8rX41 https://t.co/F7biQvuwaD — The Khel India (@TheKhelIndia) May 27, 2026
सुवर्णपदक जिंकल्यानंतर ईशा सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, ‘म्युनिक माझ्यासाठी खूप खास आहे. येथे पिस्तूल प्रकारातील स्पर्धा खूप कठीण असते. पहिल्या आठमध्ये स्थान मिळवणेही सोपे नसते. मी येथे तिसऱ्यांदा खेळत होते आणि यावेळी मला जिंकायचेच होते’. ती पुढे म्हणाली, ‘मी अजिबात शांत नव्हते. एका क्षणी माझा डावा हात थरथरत होता. मी खूप घाबरले होते. पण आमच्या खेळात दबावाला सामोरे जावेच लागते आणि यालाच अनुभव म्हणतात.’
भारताच्या इतर स्टार नेमबाजांना मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. मनू भाकरने ५८२ गुणांसह १२ वे स्थान मिळवले, तर राही सरनोबत ५८१ गुणांसह १४ व्या स्थानावर राहिली. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात भारताची आशी चौकसे अंतिम फेरी गाठण्यापासून एका गुणाने दूर राहिली. तिने ५८९ गुणांसह १० वे स्थान मिळवले. स्वित्झर्लंडच्या अॅमेली जेगीने ५९० गुणांसह अंतिम फेरीत स्थान मिळवले. तर, विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन कीरा लिऑन ५८७ गुणांसह २८ व्या स्थानावर राहिली.