Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेर बुधवारी रात्री प्रसिद्ध युट्यूबर हरीश गजवानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी डोक्यात जवळून दोन गोळ्या झाडल्या. चार वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडले का, याचा पोलिस तपास सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 15, 2026 | 09:41 AM
ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

Follow Us
Follow Us:
  • वर्दळीच्या रस्त्यावर युट्यूबरची हत्या
  • डोक्यात जवळून दोन गोळ्या
  • जुन्या वैमनस्याच्या दिशेने तपास
ठाणे : ठाण्यातील मनपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार घडला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास स्थानिक प्रसिद्ध युट्यूबर हरीश गजवानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत गजवानी यांच्या डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

डोक्यात जवळून झाडल्या दोन गोळ्या

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश गजवानी हे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच गजवानी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि काही काळ परिसरात पळापळ झाली.

हेही वाचा:Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

चार वर्षांपूर्वीच्या हल्ल्याची पार्श्वभूमी?

हरीश गजवानी यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या हत्येला चार वर्षांपूर्वीच्या एका हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षांपूर्वी संशयित आरोपी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात हरीश गजवानी हे आरोपी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत.

हल्लेखोरांचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणते कारण या हत्येमागे आहे का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. सखोल तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची भूमिका स्पष्ट होणार आहे.

Web Title: Ulhasnagar youtuber harish gajwani murder firing thane sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • latest news
  • Murder Case
  • Shooting
  • thane
  • Ulhasnagar News
  • YouTuber

संबंधित बातम्या

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
1

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा
2

Crime News: ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा अंतिम निर्णय! सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान-साहिलला फाशीची शिक्षा

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
3

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप
4

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.