Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खो खो स्पर्धेसाठी उत्साह वाढला! पुरुष – महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी पार पडली

पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेली असून सदर स्पर्धेचं उद्घाटन माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 11, 2025 | 12:01 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:
  • ८ ते ११ नोव्हेंबर २०२५ दरम्यान खो खो स्पर्धेचे आयोजन
  • महिला गटामध्ये शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर १२-८ असा चार गुणांनी विजय मिळवला
  • स्पर्धेचं उद्घाटन माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते

मुंबई : मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने कै. दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत व ओम साई ईश्वर सेवा मंडळ लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेली असून सदर स्पर्धेचं उद्घाटन माननीय खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. हि स्पर्धा मनोरंजन मैदान पेरू कंपाउंड लालबाग येथे सुरु आहे. उद्‌घाटनीय सामन्यात महिला गटामध्ये शिवनेरी सेवा मंडळाने वैभव स्पोर्ट्स क्लबवर १२-८ (मध्यंतर ६-२) असा चार गुणांनी विजय मिळवला. 

शिवनेरी सेवा मंडळच्या आयुशी गुप्ताने (४ मिः २ मि. संरक्षण व ३ गुण) अष्टपैलू खेळ केला, त्यांच्याच मुस्कान शेखने (दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी २.३० मि. संरक्षण) सुंदर साथ दिली, वैभव स्पोर्ट्स क्लबच्या अवंतिका अंबोकरने (२.३०, २ मि. संरक्षण व १ गुण) व सलोनी सावंत (२.३०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) सुंदर खेळी करत त्यांना उत्तम लढत दिली मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

PAK vs SL 1st ODI : जिओ हॉटस्टारवर नाही, तर तुम्ही Pakistan vs Sri Lanka पहिला एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहू शकता?

सरस्वती कन्या संघाची श्री समर्थ राम मंदिर दादरवर ७-६ अशी मात

महिला गटाच्या दुसऱ्या लढतीत सरस्वती कन्या संघाने श्री समर्थ राम मंदिर दादरवर ७-६ असे एक डाव एक गुणाने एकतफी लढत जिंकली. मध्यंतराला ७-३ अशी तब्बल चार गुणांची आघाडी सरस्वती कन्या संघाकडे होती सरस्वती कन्या संघाकडून जानबी लोंढेने ४, ६.३० मि. अशी एकतफी संरक्षणाची खेळी करत श्री समर्थ च्या आक्रमणाच कंबरड मोडल, तिला सेजल यादवने दोन्ही डावात प्रत्येकी २.१० मि. अशी सुंदर साथ दिली.

पराभवाने समर्थचा पिच्छा सोडला नाही

राधिका कौडुस्कर आणि नम्रता यादव यांनी प्रत्येकी दीन खेळाडू टिपून आक्रमणाची धार मजबूत केली. पराभूत श्री समर्थ व्या. मंदिर तके लढत देताना तन्वी मोरेने ४ मि. संरक्षण केले तर आस्था महाडिकने दोन सखेळाडू टिपून तिला चांगली साथ द्यायचा प्रयत्न केला पण पराभवाने समर्थचा पिछा सोडला नाही.

सम्राट राणाने नेमबाजीत रचला इतिहास आणि असे करणारा तो पहिला भारताचा शूटर

एकतर्फी लढतीचा प्रयत्न

पुरुष गटाच्या सामन्यामध्ये परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने दादरच्या वैभव स्पोर्ट्स क्लबवर १७-१३ (मध्यंतर १७-६) असा एक डाव व चार गुणांनी विजय प्राप्त केला. विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या जनार्दन सावंत (२ मि. संरक्षण), तर आक्रमणामध्ये ओमकार मिरगळने तब्बल पाच बाद करत आपलं धारदार आक्रमण प्रदर्शित केले तर वैभव स्पोर्ट्स क्लब तर्फे लहत देताना निहाल पंडितने १.१० मि. संरक्षण व ४ गुण टिपून एकतफी लढत द्यायचा प्रयत्न केला.

सिद्विक भगतने दोन गडी टिपत दिली चांगली लढत

पुरुष गटातील आणराखी एका सामन्यात ओम समर्थ भारत व्या. मंदिरने श्री समर्थ व्या. मंदिर (च) चा १२-९ (मध्यंतर १२-४) असा एक डाब ३ गुणांनी पराभव केला. ओम समर्थ तर्फे सनी तांबेने (३.४० मि. संरक्षण व ३ गुण) व प्रशिक मोरे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्तम खेळ केला तर पराभूत श्री समर्थ व संघातर्फे शिरोडकरने एक मिनिट संरक्षण करत चार खेळाडू टिपले तर सिद्रिक भगतने १.२० मि. संरक्षण करून दोन गडी टिपत चांगली लढत दिली.

Web Title: Excitement for kho kho competition increases mens womens mumbai district championship and selection tests held

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

PAK vs SL 1st ODI : जिओ हॉटस्टारवर नाही, तर तुम्ही Pakistan vs Sri Lanka पहिला एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहू शकता?
1

PAK vs SL 1st ODI : जिओ हॉटस्टारवर नाही, तर तुम्ही Pakistan vs Sri Lanka पहिला एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहू शकता?

सम्राट राणाने नेमबाजीत रचला इतिहास आणि असे करणारा तो पहिला भारताचा शूटर
2

सम्राट राणाने नेमबाजीत रचला इतिहास आणि असे करणारा तो पहिला भारताचा शूटर

राशिद खान उभा राहिला पत्नीसाठी…सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल! नक्की प्रकरण काय वाचा सविस्तर
3

राशिद खान उभा राहिला पत्नीसाठी…सोशल मिडियावरील पोस्ट व्हायरल! नक्की प्रकरण काय वाचा सविस्तर

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारतात शेवटची कसोटी मालिका कधी जिंकली होती? आश्चर्यकारक आकडेवारी
4

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने भारतात शेवटची कसोटी मालिका कधी जिंकली होती? आश्चर्यकारक आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.