Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

F4 इंडियन चॅम्पियनशिपमध्ये लुविवे साम्बुडला याचा ‘डबल धमाका’; 15 वर्षीय अ‍ॅरॉन मेहताने रचला इतिहास!

F4 इंडियन चॅम्पियनशिपमध्ये लुविवे साम्बुडला याने दोन शर्यती जिंकत गुणतालिकेत आघाडी घेतली. 15 वर्षीय अ‍ॅरॉन मेहताने सर्वात तरुण रेस विजेता होण्याचा विक्रम केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 23, 2026 | 07:25 PM
F4 इंडियन चॅम्पियनशिपमध्ये लुविवे साम्बुडला याचा 'डबल धमाका'; 15 वर्षीय अ‍ॅरॉन मेहताने रचला इतिहास!

F4 इंडियन चॅम्पियनशिपमध्ये लुविवे साम्बुडला याचा 'डबल धमाका'; 15 वर्षीय अ‍ॅरॉन मेहताने रचला इतिहास!

Follow Us
Follow Us:
  • अरिस कायरियाको दुसऱ्या स्थानी
  • साम्बुडलाने वर्चस्व कायम राखले
  • शेन चंदरिया तिसऱ्या स्थानी राहिला
F4 इंडियन चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या फेरीत गोवा एसेस जेए रेसिंगच्या लुविवे साम्बुडला याने दोन शर्यती जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नईतील मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या या स्पर्धेत कोलकाता रॉयल टायगर्सच्या 15 वर्षीय अ‍ॅरॉन मेहताने अंतिम शर्यत जिंकून स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण रेस विजेता होण्याचा मान मिळवला.

इंडियन रेसिंग फेस्टिव्हल 2026 अंतर्गत 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या या फेरीत तीन शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. पावसामुळे ट्रॅकवर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, साम्बुडलाने अचूक रणनीती आणि वेगाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. त्याने पहिल्या दोन शर्यतींमध्ये सहाव्या स्थानावरून सुरुवात करून विजय मिळवला, तर तिसऱ्या शर्यतीत तिसरे स्थान पटकावले.

अरिस कायरियाको दुसऱ्या स्थानी

या कामगिरीमुळे साम्बुडलाच्या खात्यात 138 गुण जमा झाले आहेत. किच्चाज किंग्स बेंगळुरूचा अरिस कायरियाको 117 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या आधी पाच गुणांनी पिछाडीवर असलेल्या साम्बुडलाने आता 21 गुणांची आघाडी घेतली आहे.

पहिल्या शर्यतीत साम्बुडलाने पावसाचा आणि ट्रॅकवरील परिस्थितीचा फायदा घेत आघाडी मिळवली. त्याने 9.606 सेकंदांच्या फरकाने विजय मिळवला. स्पीड डेमन्स दिल्लीच्या न्तियिसो माबुंडाने दहाव्या स्थानावरून सुरुवात करून दुसरे स्थान मिळवले, तर गोवा एसेस जेए रेसिंगचा आर्यन नरोलाने तिसरे स्थान पटकावले.

ज्युनिअर क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात; Parvinder Awana निवड समितीचे अध्यक्ष, BCCI चा मोठा निर्णय

साम्बुडलाने वर्चस्व कायम राखले

दुसऱ्या शर्यतीतही साम्बुडलाने आपले वर्चस्व कायम ठेवले. त्याने 13 फेऱ्यांची शर्यत 33 मिनिटे 22.590 सेकंदांत पूर्ण केली. माबुंडाने पुन्हा दुसरे स्थान मिळवले, तर कायरियाकोने तिसऱ्या क्रमांकावर पुनरागमन केले.

तिसऱ्या शर्यतीत मात्र अ‍ॅरॉन मेहताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱ्या मेहताने लाल झेंडा आणि सेफ्टी कारमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतरही आघाडी टिकवली. अखेरच्या फेरीत माबुंडाने त्याला मागे टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र मेहताने अवघ्या 0.546 सेकंदांच्या फरकाने विजय मिळवला. माबुंडाला सलग तिसऱ्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर साम्बुडला तिसरा आला.

दरम्यान, इंडियन रेसिंग लीगच्या पहिल्या शर्यतीत स्पीड डेमन्स दिल्लीच्या शहान अली मोहसिनने विजय मिळवला. त्याने गोवा एसेस जेए रेसिंगच्या राउल हायमनला 0.506 सेकंदांनी मागे टाकले. चेन्नई टर्बो रायडर्सचा शेन चंदरिया तिसऱ्या स्थानावर राहिला.

LA Olympics 2028 : ऑलिम्पिक क्रिकेटच्या पात्रता फेरीत मोठा बदल! आता 2028 मध्ये रंगणार क्वालिफायर सामने

चेन्नईतील या फेरीमुळे F4 इंडियन चॅम्पियनशिपमधील विजेतेपदाची लढत अधिक रंगतदार झाली आहे. साम्बुडला आघाडीवर असला, तरी आगामी फेऱ्यांमध्ये कायरियाकोचे आव्हान कायम राहणार आहे. दुसरीकडे, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या मेहताच्या कामगिरीकडेही आता सर्वांचे लक्ष असेल.

Web Title: F4 indian championship luviwe sambudla aaron mehta chennai rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • chennai
  • County Championship
  • Goa

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.