KKR VS RCB : आज IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे संघ आमनेसामने असणार आहेत. ईडन गार्डन्सवर नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदलांसह प्रवेश केला आहे. कॅमेरून ग्रीन, मोहम्मद सिराज आणि करण शर्मा यांचा आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन-
फाफ डू प्लेसी (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, करण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन-
फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.