फोटो सौजन्य - X
रोहित शर्मा : भारताचा स्टार आणि कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आता रोहित शर्मा फक्त एक दिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तो आयपीएल देखील खेळत आहे. आता रोहित शर्माच्या एका चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये चक्क रोहित शर्माचे चाहता हा रोहित शर्माची जर्सी घेऊन युनिवर्सिटीमध्ये त्याची डिग्री घेण्यासाठी गेला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक रोहित शर्माचा चाहता हा त्याच्या युनिव्हर्सिटी कोर्टमध्ये डिग्री घेताना दिसत आहे. तो लाईनीत उभा असतो आणि जेव्हा त्याचा नंबर येतो तेव्हा तो स्टेजवर जाऊन सर्वांसमोर 45 नंबरची जर्सी ही दाखवतो. या जर्सीवर 45 नंबर आणि रोहित असे नावही आहे. या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर सध्या प्रचंड वायरल होत आहे.
On his graduation day, a Fan paid tribute to Rohit Sharma for his Test retirement by showcasing Rohit’s jersey at his university in Saint Louis, Spain. ❤️ 🇮🇳 pic.twitter.com/KJ8YDF0vmn
— Aarchi (@Oye_Aarchi) May 16, 2025
रोहित शर्माने 7 मे रोजी सोशल मीडियावर त्याच्या त्याचा फोटो काढून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला त्यानंतर काल म्हणजेच 16 मे रोजी वानखेडे मैदानावर रोहित शर्मासाठी अभिमानाची बाब म्हणजे त्याच्या नावाचे ऐतिहासिक मैदानावर उभारण्यात आलेले स्टॅन्ड. वानखेडेच्या मैदानावर रोहित शर्माच्या नावाचे स्टॅन्ड उभारण्यात आले आहे त्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले.
RCB vs KKR सामन्यापूर्वी बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, भारतीय सैन्याला मिळणार हा विशेष सन्मान
या उद्घाटन समारंभाच्या वेळी रोहित शर्माचे आई-वडील, भाऊ वहिनी आणि त्याचबरोबर त्याची पत्नी रितिका देखील ते उपस्थित होते. काल रोहित शर्माने भाषण केले यामध्ये त्यांनी त्याच्या कुटुंबाचे आभार मानले. त्याचबरोबर बीसीसीआयने मुंबई क्रिकेट बोर्डाचे देखील आभार मानले. रोहित शर्माचे नेतृत्वात भारताचे संघाने मागील वर्षात 2024 मध्ये टी ट्वेंटी विश्वचषक नावावर केला. त्याचबरोबर 2025 मध्ये भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी देखील नावावर केली आहे. भारताचे संघाने रोहित शर्माचे नेतृत्वात मागील काही वर्षांमध्ये खूप चांगले कामगिरी केले आहे त्याचबरोबर मागील बारा महिन्यांमध्ये त्याने दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.