Mohammad Shami: Mohammad Shami's daughter played Holi; fans decided he was a 'criminal', even his wife was criticized..
Mohammad Shami : नुकतीच चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा संपली आहे. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत स्पर्धेचे विजेतपद पटकावले आहे. या स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिल्याने एका धर्मगुरूने त्याच्यावर आरोप केले होते, तेव्हा शमी चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा शमीचे नाव मुलीमुळे त्याचे नाव चर्चेत आले आहे. आज म्हणजे 14 मार्च रोजी देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता. या वेळी शमीच्या मुलीनेही यात सहभाग घेतला आहे. आयरा मनसोक्त होळी सणाच्या उत्सवात रंगात रंगली होती.
आयराचा होळी खेळतानाचा फोटो शमीची माजी पत्नी हसीन जहाँने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर एकच गदारोळ झालेला दिसून आला. चाहत्यांनी हसीन जहाँला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि मुस्लिम असूनही रमजान महिन्यात होळी खेळणे हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. अनेक चाहत्यांकडून तिला ट्रोल करण्यात आले तसेच तिला लाज बाळगण्याचा देखील सल्ला दिला आहे.
भारतात होळी हा सण सामान्यतः हिंदू धर्मातील लोकांकडून साजरा करण्यात येतो. शमीची माजी पत्नी हसीन जहाँ इस्लामला मानत असली तरी मात्र होळी खेळण्यास पुढे आली आहे. यासाठी तिने होळी खेळण्यासाठी आपल्या मुलीला देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे तिच्या मुलीने आपल्या मैत्रिणींसोबत या पवित्र सणाचा आनंद लुटला आहे.
हसीन जहाँ ने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये शमीची मुलगी रंगात भिजलेली दिसत आहे. हे फोटो बघून तिच्या समाजातील काही चाहत्यांनी हा फोटो सोशल मीडियावर पाहताच हसीन जहाँवर आगपाखड करण्यास सुरवात केली. एका चाहत्याकडून तिला निरक्षर म्हणण्यात आले. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘रमजानचा महिना आहे, लाज वाटू द्या.’ असे म्हटले. तर बाकी इतर चाहत्यांनी मात्र शमीची मुलगी तसेच हसीन जहाँचे कौतुक आणि होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलपूर्वीच विराट कोहलीची जोरदार फलंदाजी; किंगच्या नवीन लूकने महिला वर्ग घायाळ; पहा फोटो…
हसीन जहाँने सोशल मिडियावर मुलगी आयराने होळीच्या एक दिवस आधी डान्स केलेला एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हीडिओमध्ये शमीची मुलगी होळीच्या गाण्यांवर नाचताना दिसत आहे. हा एका डान्स क्लासचा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे अनेक चाहते चिडलेले दिसून आले. रमजानच्या काळात असे करणे हा गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चाहत्यांकडून हसीन जहाँवर शमीच्या मुलीला आपल्यासारखच बिघडवल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
हेही वाचा :IPL 2025 : युझवेंद्र चहलचा अचानक मोठा निर्णय; आयपीएलनंतर ‘या’ विदेशी संघासाठी खेळताना दिसणार..
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांची 2012 मध्ये ओळख झाली होती. आयपीएल दरम्यान ते एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. त्याच रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. यानंतर हसीन जहाँने चीअरलीडर आणि मॉडेल म्हणून करिअर सोडले. एका वर्षानंतर 2015 मध्ये त्यांना मुलगी(आयरा) झाली. मात्र, शमी आणि हसीनचे नाते ३ वर्षच टिकू शकले आणि त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.