IPL 2025 : आयपीएलपूर्वीच विराट कोहलीची जोरदार फलंदाजी; किंगच्या नवीन लूकने महिला वर्ग घायाळ;(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार संपला असून आता क्रिकेटप्रेमींना 22 मार्चला सुरू होणाऱ्या आपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेध लागले आहेत. भारताने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावर केली असून यामध्ये विराट कोहलीचे मोठे योगदान आहे. अशातच आता विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पहिली ट्रॉफी मिळवून देण्यास सज्ज झाला आहे. मात्र, याआधीच त्याने चाहत्यांना आपल्या लुकने भुरळ घातली आहे. त्याने आपली हेअरकट बदलला आहे. नव्या लूकमध्ये तो धुमाकूळ घालताना दिसत आहे. किंग कोहलीला या लूकमध्ये पाहून महिला वर्ग घायाळ झालेला दिसून येत आहे. महिला चाहत्यांना त्याला पाहून वेड्या हॉट आहेत.
हेही वाचा : Asia Cup : क्रिकेटप्रेमींसाठी दु:खद बातमी; आशिया कपमध्ये खेळणार नाहीत ‘हे’ दोन भारतीय दिग्गज; ‘हे’ आलं कारण समोर…
चाहत्यांना आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली धुमाकूळ घालताना पाहायला मिळणार आहे. मात्र, आयपीएल सुरू होण्याआधीच कोहलीच्या नव्या लूकने इंटरनेटवर धुमाळकुळ घातला आहे. त्याचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन हेअरस्टाइलमध्ये आकर्षण दिसून येत आहे. त्याच्या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.
पाकिस्तानकडे यजमानपद असणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने दमदार कामगिरी करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या आहेत. त्याने या स्पर्धेत शानदार फलंदाजी करत भारताला अंतिम फेरीत पोहचवले आहे. त्याच्या फलंदाजीसमोर मोठेमोठ्या गोलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. विशेषत: उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीने पाकिस्तानविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली खेळी कायम लक्षात राहणारी आहे.
चाहत्यांना आता आपल्या लाडक्या विराट कोहलीला आयपीएलमध्ये धुमाकूळ घालताना पाहायचे आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो त्याच्या संघाला आरसीबीचे पहिले विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. यावेळी बेंगळुरूची धुरा रजत पाटीदार यांच्या हाती असणार आहे.
हेही वाचा : अफगाणिस्तानचा खेळाडू Hazratullah Zazai वर कोसळला दुःखाचा डोंगर! अडीच वर्षांच्या मुलीचे झाले निधन
विराट कोहली सध्या छोट्या ब्रेकवर आहे, जिथे तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र, तो लवकरच आरसीबी शिबिरात सामील होणार आहे. बेंगळुरूने त्याला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे, जिथे तो यावेळी रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.