IPL 2025 : युझवेंद्र चहलचा अचानक मोठा निर्णय; आयपीएलनंतर 'या' विदेशी संघासाठी खेळताना दिसणार..(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल 2025 मध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या सिसजनमध्ये तो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या दोन महिन्यांच्या टी-20 लीगच्या समाप्तीनंतर चहल आणखी एका स्पर्धेत सहभागी होऊन खेळण्याच्या तयारीत दिसत आहे. तो 2025 काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
युजवेंद्र चहलने गेल्या वर्षी काउंटी चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता, जिथे त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक फलंदाजांना अडकवले होते. चहल आता या मोसमातही आपली जादू दाखवण्यासाठी तयार झाला आहे. चहल केवळ काउंटी चॅम्पियनशिपमध्येच भाग घेणार नाही, तर त्यानंतर तो इंग्लंडची देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा असलेल्या एकदिवसीय चषकात देखील भाग घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल 22 जून रोजी मिडलसेक्सविरुद्ध पहिला सामना खेळणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी चहलने इंग्लंडमध्ये पदार्पण केले होते, जिथे त्याने केंटविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. गेल्या वेळी चहल केवळ 4 प्रथम श्रेणी सामने खेळू शकला होता, परंतु त्याने 21 च्या उत्कृष्ट सरासरीने 19 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली नॉर्थम्प्टनशायरने डर्बीशायर आणि लीसेस्टरशायरविरुद्ध सलग सामने जिंकले होते.
Big boost for Northants as Indian leg-spinner Yuzvendra Chahal makes County Ground return #nccc @yuzi_chahalhttps://t.co/A5miarxwmt
— Northampton Chron (@ChronandEcho) March 13, 2025
दुसऱ्यांदा काऊंटी खेळणारा चहल म्हणाला की, ‘गेल्या हंगामात मी माझा वेळ खरोखरच एन्जॉय केला होता, त्यामुळे मला परत आल्याने खूप आनंद होत आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये काही महान लोक असून मी पुन्हा त्याचा भाग होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. हंगामाच्या शेवटी आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. त्यामुळे आशा आहे की, आम्ही त्याची पुनरावृत्ती करू आणि विजय मिळवू.’ असे चहल म्हणाला.
हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलपूर्वीच विराट कोहलीची जोरदार फलंदाजी; किंगच्या नवीन लूकने महिला वर्ग घायाळ; पहा फोटो…
अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर सिंग, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, पायला अविनाश, प्रवीण दुबे