Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 मध्ये रंगणार थरार, 25 जूनला फुटबॉलचा महासंग्राम; ब्राझील ते मेक्सिको 12 संघ मैदानात, पाहा संपूर्ण शेड्यूल

25 th june FIFA World Cup 2026 Schedule: फिफा विश्वचषक २०२६ मध्ये २५ जून रोजी गट फेरीतील सहा महत्त्वाचे सामने खेळले जाणार असून अनेक बलाढ्य संघांसाठी बाद फेरीत प्रवेश निश्चित करण्याची ही निर्णायक संधी आहे. या सामन्यांनंतर गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ यांची अंतिम क्रमवारी स्पष्ट होणार होईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 24, 2026 | 06:10 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:
  • FIFA World Cup 2026 मध्ये रंगणार थरार
  • ब्राझील ते मेक्सिको 12 संघ मैदानात
  • 25 जूनला फुटबॉलचा महासंग्राम
फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026 ) स्पर्धा आता अधिक रोमांचक टप्प्यात पोहोचली असून गट फेरीतील प्रत्येक सामना संघांच्या भवितव्याचा निर्णयाक ठरत आहे. २५ जून रोजी स्पर्धेत एकूण सहा महत्वाचे सामने खेळले जाणार आहे. त्यानंतर गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ यांची अंतिम क्रमवारी स्पष्ट होईल. ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंड यांसारख्या बलाढ्य संघांसाठी बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची ही संधी असणार आहे. तर काही संघांसाठी स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी करो या मरो चा सामना असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक मानला जात आहे.रतात हे सामने केव्हा आणि कोणत्या वेळी पाहता येतील जाणून घेऊयात.

Cricket News: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर RCB ने फिरवली पाठ; ‘हा’ खेळाडू आता कमबॅकसाठी सज्ज

स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा अन् बोस्निया-अँड-हर्झेगोविना विरुद्ध कतार

सामन्यांची सुरुवात स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा आणि बोस्निया-अँड-हर्झेगोविना विरुद्ध कतार या लढतींनी होणार आहे. गट ब मधील हे दोन्ही सामने गुणतालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. स्वित्झर्लंड आणि कॅनडा या दोन्ही संघांकडे बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याची संधी आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत आणि विजेता संघात अव्वल स्थान मिळवू शकतो. कॅनडाने आपल्या मागील सामन्यात कतारला ६-० ने हरवून उत्कृष्ट कामगिरी दाखवली. दुसरीकडे, स्वित्झर्लंडने बोस्निया आणि हर्झेगोविनावर ४-१ ने विजय मिळवून आपला आत्मविश्वास वाढवला. तर कतार आणि बोस्निया विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील. दोन्ही संघ प्रत्येकी एका गुणासह उतरतील. नॉकआऊट फेरी गाठण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

ब्राझील- स्कॉटलंड सामन्याकडे सर्वांचे लक्ष, मोरोक्को आणि हैतीही भिडणार

दिवसातील मुख्य सामना स्कॉटलंड आणि ब्राझील यांच्यात रंगणार आहे. ब्राझीलने आतापर्यंत स्पर्धेत प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले आहे आणि संघ विजयाची मालिका कायम ठेवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. चार गुणांसह ब्राझील मजबूत स्थितीत आहे. दुसरीकडे, स्कॉटलंडसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि गुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. त्याचवेळी मोरोक्को आणि हैती यांच्यातील सामना देखील गटातील स्थान निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मोरोक्को उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून चार गुणांसह ‘क’ गटात अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत कायम आहे. स्कॉटलंडला १-० ने पराभूत करून या संघाने आपली ताकद सिद्ध केली आहे. दुसरीकडे, हैतीने सलग दोन सामने गमावले असून ते स्पर्धेतून जवळपास बाहेर पडले आहेत.

द.आफ्रिका विरुद्ध द. कोरिया, मेक्सिको आणि चेक रिपब्लिकची कसोटी

दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका विरुद्ध दक्षिण कोरिया आणि चेकिया विरुद्ध मेक्सिको हे दोन सामने खेळवले जातील. दक्षिण कोरिया आणि मेक्सिको या दोन्ही संघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. ‘अ’ गटात दक्षिण कोरिया तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडे केवळ एक गुण आहे. दक्षिण कोरियाने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. हा सामना जिंकल्यास ते बाद फेरीसाठी पात्र ठरतील. दक्षिण आफ्रिकेलाही बाद फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल. सलग दोन विजयांसह मेक्सिको उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून सहा गुणांसह ‘अ’ गटात आघाडीवर आहे. या संघाने दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण कोरिया या दोन्ही संघांना पराभूत केले आहे. दुसरीकडे, चेक रिपब्लिककडे फक्त एक गुण आहे.

विश्वचषकातील चुरस वाढली

यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच ४८ संघ सहभागी झाले आहे. १२ गटांमधून पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक संघ झुंज देत आहे. त्यामुळे गट फेरीतील प्रत्येक सामना निर्णायक ठरत असून या सामन्यांच्या निकालांमुळे अनेक गटांतील समीकरणे बदलू शकतात. फुटबॉल चाहत्यांसाठी आजचा दिवस उत्सुकता आणि थराराने भरलेला असणार आहे.

होणाऱ्या बायकोच्या मृत्यूनंतरही मैदान न सोडणारा योद्धा; जन्मदिनीच घेतला शेवटचा श्वास, दिग्गज क्रिकेटरचे निधन

Web Title: Fifa world cup 2026 june 25 matches brazil mexico switzerland schedule group stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Brazil
  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Match
  • Football Tournament

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.