Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 Quarterfinals Schedule: 40 संघ आउट; ‘या’ 8 संघात रंगणार थरार, पाहा क्वार्टर फायनलचे संपूर्ण वेळापत्रक

FIFA World Cup 2026 Quarterfinals Schedule: राउंड ऑफ १६ चे सामने संपल्यानंतर क्वार्टरफायनसाठी ८ संघ निश्चित झाले आहेत. या ८ संघामध्ये आता हायव्होटेज सामने पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 08, 2026 | 05:42 PM
photo- Ai

photo- Ai

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ 8 संघात रंगणार थरार
  • क्वार्टर फायनलचे वेळापत्रक एकदा वाचाच
  • तिन्ही यजमान संघ स्पर्धेतून बाहेर
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा आता सर्वात रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. पहिल्यांदाच ४८ संघ फिफा विश्वचषकात सहभागी झाले होते. राउंड ऑफ ३२ आणि राउंड ऑफ १६ नंतर एकूण ४० संघ बाहेर पडले आहेत. आता या शर्यतीत केवळ आठ संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. १६ संघांच्या फेरीत झालेले मोठे उलथापालथ, शेवटच्या क्षणी झालेले गोल, पेनल्टी शूटआऊटमधील थरारक नाट्य आणि दिग्गज खेळाडूंची भंगलेली स्वप्ने यानंतर, उपांत्यपूर्व फेरीतील चार महासंग्राम आता निश्चित झाले आहेत. गतविजेता अर्जेंटिना आपले विजेतेपद टिकवून ठेवू शकेल का, की ७२ वर्षांनंतर इतिहास रचणारा स्वित्झर्लंड पुन्हा एकदा अनपेक्षित विजय मिळवेल? की बलाढ्य स्पेन २०१० नंतरच्या आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकेल? याचे चित्र पुढील सामन्यांमध्ये स्पष्ट होईल.

Switzerland beat Colombia: ७२ वर्षांनंतर स्वित्झर्लंडची ऐतिहासिक झेप; पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा पराभव

क्वार्टरफायनलसाठी ८ संघ निश्चित

क्वार्टरफायनल राउंडमध्ये अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, मोरोक्को आणि स्पेन या संघानी धडक मारली आहे. नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे असे संघ आहेत ज्यांच्याकडून इथपर्यंत पोहोचण्याची सर्वात कमी अपेक्षा होती. आता हे आठ संघ उपांत्य फेरीतील अंतिम चार संघ निश्चित करण्यासाठी चार सामने खेळतील.

विश्वचषकाचे तिन्ही यजमान संघ स्पर्धेतून बाहेर

राउंड ऑफ १६ मध्ये आठ सामने खेळले गेले आणि त्यापैकी जवळजवळ सर्वच अत्यंत रोमांचक होते. सर्वात आश्चर्यकारक निकाल पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलविरुद्धचा होता, ज्यांना नॉर्वेकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. गतविजेत्या अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्ध ०-२ ने पिछाडीवर असताना ३-२ ने विजय मिळवून स्पर्धेतून बाहेर पडणे थोडक्यात टाळले. या स्पर्धेचे तिन्ही यजमान संघ अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडले. पॅराग्वे, ब्राझील, पोर्तुगाल , इजिप्त आणि कोलंबिया यांचाही स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

स्पर्धेचे वेळापत्रक

  • फ्रान्स विरुद्ध मोरोक्को, १० जुलै, दुपारी १:३० वाजता
  • स्पेन विरुद्ध बेल्जियम, ११ जुलै, दुपारी १२:३०
  • नॉर्वे विरुद्ध इंग्लंड, १२ जुलै, पहाटे २:३० वाजता
  • अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड, १२ जुलै, सकाळी ६:३० वाजता

उपांत्यपूर्व फेरीत चुरशीची स्पर्धा

स्पर्धा आता सर्वात निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल, तर ७२ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला स्वित्झर्लंड आपला इतिहास आणखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल. फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, बेल्जियम, नॉर्वे आणि मोरोक्को हे संघ देखील सेमिफायनमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी आमनेसामने येतील. चाहत्यांना पुन्हा एकदा थरारक सामने पाहायला मिळतील.

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

Web Title: Fifa world cup 2026 quarterfinals schedule qualified 8 teams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • France
  • switzerland

संबंधित बातम्या

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक
1

France Student Protest : ‘इस्लाम फ्रान्सवर ताबा मिळवतोय’; ट्रुथ सोशल’वर ट्रम्प यांची वादग्रस्त पोस्ट; आंदोलनाचा विस्फोटक उद्रेक

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
2

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
3

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.