Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

France Student Protest : फ्रान्समधील हजारो हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षकांची कमतरता, वर्गातील प्रचंड गर्दी आणि निकृष्ट शाळांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन आता देशव्यापी पसरले असून, ६ ऑक्टोबर रोजी एक मोठे निदर्शन होणार आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 04, 2026 | 03:26 PM
France student protest France high school riots France student mass arrest

France student protest France high school riots France student mass arrest

Follow Us
Follow Us:
  • देशव्यापी असंतोष आणि ५००० हून अधिक अटक
  • शाळांचे कुलूप आणि पोलिसांशी संघर्ष
  • ६ ऑक्टोबर रोजी मोठ्या आंदोलनाची हाक

युरोपमधील प्रमुख आणि प्रगत देश मानल्या जाणाऱ्या फ्रान्समध्ये (France) सध्या शैक्षणिक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे प्रचंड मोठा सामाजिक असंतोष उफाळून आला आहे. हजारो हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या मूलभूत शैक्षणिक हक्कांसाठी रस्त्यावर उतरले असून त्यांनी संपूर्ण देशात संतापाची लाट पसरवली आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे डबे आणि वाहने पेटवून देणे, हायस्कूलच्या इमारतींना कुलूप ठोकणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे यामुळे अनेक शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या हिंसक आंदोलनाला आवर घालण्यासाठी प्रशासनाला अश्रूधूर आणि रबर बुलेटचा वापर करावा लागला आहे.(France Student Protest)

या भीषण परिस्थितीचे गांभीर्य यावरून स्पष्ट होते की, केवळ एका आठवड्याच्या आत ५,००० हून अधिक आंदोलक विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकट्या शुक्रवारी १,७४७ लोकांना अटक करण्यात आली, तर सुमारे ७३५ शैक्षणिक संस्थांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. गुरुवारी हा आकडा १,००० हून अधिक हायस्कूलपर्यंत पोहोचला होता. स्थानिक पातळीवर शाळांमधील समस्यांवरून सुरू झालेल्या एका छोट्या विरोधाचे रूपांतर आता संपूर्ण फ्रान्सच्या राष्ट्रीय संकटात झाले आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख विद्यार्थी संघटनांनी येत्या ६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण फ्रान्समध्ये अभूतपूर्व देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

विद्यार्थी रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या आंदोलनाची मुख्य कारणे

फ्रान्ससारख्या विकसित देशात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे हिंसक मार्गाने रस्त्यावर का उतरावे लागले, हा प्रश्न सध्या जगभरात विचारला जात आहे. या आंदोलनाचे मूळ एका रात्रीत तयार झालेले नसून गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा हा उद्रेक आहे.

  • शिक्षकांची तीव्र कमतरता: फ्रान्समधील अनेक हायस्कूलमध्ये नियमित शिक्षकांची प्रचंड कमतरता आहे. एखादा शिक्षक आजारी पडल्यास किंवा दीर्घ रजेवर गेल्यास त्याच्या जागी बदली शिक्षक उपलब्ध करून देण्याची कोणतीही सोय प्रशासनाकडून केली जात नाही. यामुळे गणित, विज्ञान आणि भाषा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांचे तासच्या तास आणि महिना न महिना वर्ग रद्द केले जात आहेत, ज्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य

  • वर्गातील प्रचंड गर्दी आणि अवाजवी पटसंख्या: शाळांमध्ये एका वर्गात २५ ते ३० विद्यार्थ्यांची क्षमता असताना प्रत्यक्ष वर्गात ३५ ते ४० विद्यार्थ्यांना बसवले जात आहे. यामुळे शिक्षकांचे वैयक्तिक लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावर राहत नाही आणि अभ्यासाचे वातावरण पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
  • मोडकळीस आलेल्या इमारती आणि मूलभूत सुविधांचा अभाव: अनेक हायस्कूलच्या इमारती अत्यंत जुन्या आणि मोडकळीस आलेल्या आहेत. हिवाळ्यात गरम पाण्याची व्यवस्था नसणे, उन्हाळ्यात वर्ग तापणे आणि काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही टंचाई असणे अशा अत्यंत वाईट परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.

 

BREAKING 🚨 🇧🇩 : Today in Mirzapur, Tangail, Bangladesh,Muslims vandalized a Durga idol of Hindus…. With only a few days left before Durga Puja, Muslims have sent a message by vandalizing the idol that Hindus will not be allowed to celebrate Durga Puja here… https://t.co/6UKKeLlPmZ — Bangladeshi Hindus Community🚨🇧🇩 (@Hindubd49346) October 1, 2026

credit – social media and Twitter

  • तणावपूर्ण वेळापत्रक आणि मानसिक ताण: सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणारे दीर्घ आणि कडक वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. अभ्यासाचा ताण आणि अपुऱ्या सुविधा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढीस लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका

राष्ट्रीय संकट आणि ६ ऑक्टोबरच्या आंदोलनाचे सावट

फ्रान्स सरकारने हे आंदोलन रोखण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा ताफा तैनात केला आहे. मात्र, प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आहेत. ५,००० हून अधिक लोकांना अटक करूनही आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही. उलटपक्षी, पालकांचा आणि अनेक शिक्षक संघटनांचा पाठिंबाही आता या आंदोलक विद्यार्थ्यांना मिळताना दिसत आहे.

विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत सरकार शिक्षकांची भरती करत नाही आणि शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी बजेट मंजूर करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या देशव्यापी निदर्शनांमुळे संपूर्ण फ्रान्सची वाहतूक, शिक्षण आणि सरकारी यंत्रणा ठप्प होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आता फ्रान्सचे सरकार या शैक्षणिक आणि सामाजिक संकटावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: France high school student protest over 5000 arrested october 6 strike hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • France
  • Student Protest
  • World news

संबंधित बातम्या

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ
1

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले
2

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले

Bangladesh : शेख हसीनांच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेमुळे बांगलादेशचा तीळपापड; पंतप्रधान तारिक रहमान यांनी रद्द केला भारत दौरा
3

Bangladesh : शेख हसीनांच्या ‘त्या’ पत्रकार परिषदेमुळे बांगलादेशचा तीळपापड; पंतप्रधान तारिक रहमान यांनी रद्द केला भारत दौरा

Donald Trump: ट्रम्प आणि जे.डी. व्हान्स यांच्या मेकअप खर्चावरून रिपब्लिकन पक्षात राडा; अध्यक्ष जो ग्रुटर्स यांना हटवण्याची मागणी
4

Donald Trump: ट्रम्प आणि जे.डी. व्हान्स यांच्या मेकअप खर्चावरून रिपब्लिकन पक्षात राडा; अध्यक्ष जो ग्रुटर्स यांना हटवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.