Kerala Football Match Fire VIDEO : केरळमधील ऐन रोमांचक मोडमध्ये आलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान भीषण आग, अचानक आकाशातून आले रॉकेट, पाहा VIDEO
मलप्पुरम : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक मोठा अपघात झाला. येथे एका फुटबॉल स्पर्धेदरम्यान फटाके फोडले जात होते. यादरम्यान, फटाके नियंत्रणाबाहेर गेले आणि थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत पडले. यामुळे अनेक लोक भाजले. या अपघातात ५८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरीकोड येथील थेराट्टम्मल येथे सेव्हन्स फुटबॉल स्पर्धेच्या समारोप समारंभात फटाके फोडल्याने ही घटना घडली.
केरळ फुटबॉल सामन्यादरम्यान मोठी घटना
Caught On Cam: Firecracker Explosion During Football Match In Kerala’s Malappuram Leaves Over 30 Injured 🔥Reports indicate that the explosion took place at Therattammal, near Areekode, during the final match of a football tournament..! pic.twitter.com/NE8flkeZtV
— Dhram Goswami (@dhram_goswami) February 19, 2025
पोलिसांनी सांगितले की, या घटनेत जखमी झालेल्यांना इरोडमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतेक प्रेक्षकांच्या दुखापती गंभीर नाहीत. युनायटेड एफसी नेल्लीकुथ आणि केएमजी मावूर यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी ही घटना घडली.
५४ जणांना डिस्चार्ज
मैदानाच्या मध्यभागी आतषबाजी सुरू होताच, फटाके गॅलरीच्या पुढच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांकडे उडाले. फटाक्यांपासून वाचण्यासाठी पळताना काही लोक पडले आणि भाजले तर काही जखमी झाले. सुदैवाने हा मोठा अपघात झाला नाही. मात्र, या अपघातात चार जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रतिष्ठीत स्थानिका स्पर्धा
केरळमधील मलप्पुरममध्ये सेव्हन्स फुटबॉल स्पर्धा ही एक प्रतिष्ठित स्थानिक स्पर्धा मानली जाते. हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो समुदायांना एकत्र आणतो. हे फुटबॉल सामने अनेकदा लहान मैदानांवर खेळवले जातात. ही स्पर्धा नोव्हेंबर ते मे पर्यंत चालते, ज्यामध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी जमते. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमातही अशीच गर्दी होती. पण फटाके सुरू झाल्यानंतर ही दुर्घटना घडली.