Good news for football fans! Footballer Messi will grace the Wankhede ground; will play a cricket match with Sachin-Virat
Footballer Messi to tour India : भारतात क्रिकेटची लोकप्रियता सर्वश्रुतअसले तरी इतर खेळाप्रती देखील भारतचे प्रेम दिसून येत असते. या इतर खेळात फुटबॉलचे देखील वेगळे स्थान आहे. अशातच भारतातील फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांनी भारत दौऱ्यावर येणार आहे. 13 ते 15 डिसेंबरदरम्यान मेस्सी भारतात असून तो तीन ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती आहे. यात एक खास गोष्ट म्हणजे या दौऱ्यादरम्यान, मेस्सी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या क्रिकेटच्या दिग्गजांसोबत वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामना देखील खेळणार असल्याचं वृत्त समोर आले आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : स्टार श्रेयस अय्यर आशिया कपसाठी संघात परतणार? २० महिन्यांनंतर गाजवणार मैदान..
मिळालेल्या माहितीनुसार, लिओनेल मेस्सी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 7-ए-साईड क्रिकेट सामना खेळणार आहे. मेस्सी 14 डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. एका प्रसिद्ध इव्हेंट एजन्सीकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनला 14 डिसेंबर रोजी मैदान राखीव ठेवण्याची विनंती करण्यात आल्याचीन माहिती समोर आली आहे. त्यानंतर मेस्सी कोलकात्याला भेट देणार आहे. तिथे ईडन गार्डन्समध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलकाता भेटीदरम्यान मेस्सी मुलांसाठी फुटबॉल कार्यशाळेचे आयोजन करणार आहे. मेस्सीच्या सन्मानार्थ ‘GOAT CUP’ स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे.
हेही वाचा : IND vs ENG 5th Test : इंग्लिश क्रिकेटपटू ‘पांढरे हेडबँड’ घालून उतरले मैदानात; कारण आलं समोर, वाचा सविस्तर
“मेस्सी 14 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर असणार आहे. तो माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट सामना देखील खेळण्याची शक्यता आहे. सर्वकाही अंतिम झाल्यानंतर आयोजक संपूर्ण वेळापत्रक तयार करणारा आहेत,” असे एमसीएच्या एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितलेया आहे. लिओनेल मेस्सीने यापूर्वी 2011 मध्ये भारतात आला होता. त्यावेळी त्याने कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना देखील खेळला होता. आता 14 वर्षांनंतर तो पुन्हा भारत दौऱ्यावर येणारासल्याचे वृत्त कळल्याने फुटबॉलप्रेमी खुश झाले आहेत.