
Not Sachin Tendulkar, but this batsman was the difficult one to bowl to! Pakistan's Saeed Ajmal made a big revelation regarding bowling.
Pakistan’s Saeed Ajmal’s revelation : सईद अजमलला गोलंदाजी करताना एका फलंदाजाने खूप त्रास दिला आहे.सईद अजमलने आता अशा फलंदाजाबद्दल खुलासा केला आहे की ज्याविरुद्ध गोलंदाजी करणे त्याला सर्वात कठीण गेले आहे. अजमलने सर्वकालीन महान सचिन तेंडुलकरला कठीण फलंदाज मानले नसून या माजी पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाने श्रीलंकेचा कुमार संगकाराला गोलंदाजी करणे कठीण जात अअसल्याचे सांगितले आहे. जमल असे देखील सांगितले की, “रिकी पॉन्टिंग हा असा फलंदाज आहे ज्याला मी जास्त गोलंदाजी केली नाही. मला नेहमीच पॉन्टिंगला बाद करायचे होते, पण तसे झाले नाही. मी त्याच्याविरुद्ध खूप कमी वेळा क्रिकेट खेळलो आहे.”
हेही वाचा : Vijay Merchant Trophy : अबब! 3 धावांत चटकावले 8 बळी; विराज माहेश्वरीचा ऐतिहासिक विक्रम
माजी पाकिस्तानी ऑफ स्पिनर सईद अजमलने एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर पाहुणा म्हणून आलेल्या सईद अजमलने खुलासा केला की २००९ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आम्ही परतलो तेव्हा पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधानांकडून आम्हाला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा चेक देण्यात आला होता. परंतु ते चेक बाउन्स झाले.
माजी पाकिस्तानी ऑफ स्पिनर सईद अजमलने यह देखील खुलासा केला की, “आम्हाला मिळालेले चेक बाउन्स झाले, त्यानंतर खेळाडूंना सांगण्यात आले की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. तसेच सर्वांना त्यांचे पैसे मिळतील. पण अध्यक्षांनी स्पष्टपणे नकार दिला. ते पुढे म्हणाले की ‘आम्ही चेक आणायचे कुठून?’ त्यांनी नया प्रकरणापासून हात झटकले होते. आयसीसीकडून आलेले पैसे पाकिस्तानी खेळाडूंना मिळाले.”
हेही वाचा : मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियामध्ये फूस्स…4 BBL सामन्यांमध्ये ठरला अपयशी! आकडेवारी फारच खराब
टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घोषित
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी एक महिना बाकी असताना अनेक संघ आपापल्या तयारीला लागले आहेत. सोशल मिडियावर संघाच्या घोषणा करण्यात येत आहेत. तर काही खेळाडू हे विश्वचषकासाठी मैदानावर सराव करताना देखील पाहायला मिळत आहेत.दरम्यान, २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले असून वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्यासह टिम डेव्हिड यांचाही समावेश आहे. दरम्यान, मिचेल ओवेन आणि बेन द्वारशियस यांना अंतिम १५ संघातून वगळण्यात आले.