विराज माहेश्वरी(फोटो-सोशल मीडिया)
Viraj Maheshwari’s historical record : विराज माहेश्वरीच्या ऐतिहासिक घातक गोलंदाजी आणि कर्णधार कुश शर्माच्या शानदार द्विशतकाच्या बळावर विदर्भाने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात चंदीगडचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह, विदर्भाने ३० गुणांसह एलिट ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवून बाद फेरीत एंट्री केली. ज्यामुळे विदर्भाच्या क्रिकेट चाहत्यांना नवीन वर्षाची एक अविस्मरणीय भेट मिळाली आहे.
हेही वाचा : क्रीडा क्षेत्रात भारतीय Gen.G चा जलवा! क्रिकेटपासून बुद्धिबळापर्यंत चमकले ‘हे’ तारे
कर्नाटकातील शिमोगा येथील केएससीए मैदानावर खेळवण्यात आलेल्या तीन दिवसीय सामन्यात, चंदीगडने पहिल्या डावात २३७ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, विदर्भाचा कर्णधार कुश शर्माने शानदार फलंदाजी करत द्विशतक ठोकले, तर ओम धोत्रेने अर्धशतक झळकावले. या खेळींमुळे, विदर्भाने ५ बाद ३४४ धावा करून आपला डाव घोषित केला आणि १०७ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात चंदीगडने ३ बाद ६ अशी सुरुवात केली काहरी परंतु विदर्भाच्या गोलंदाजांसमोर त्यांचे फलंदाज उभे राहू शकले नाहीत. विराज आणि रोनिक हेडाऊ यांच्या अचूक लाईन आणि लेंथमुळे फलंदाज चांगलेच अडचणीत आणले. संपूर्ण संघ फक्त ३१ धावांवर गारद झाला.
कर्णधार यशजित सिंगने सर्वाधिक १० धावा केल्या, तर तीन फलंदाज त्यांचे खाते देखील उघडू शकले नाहीत. विराजने फक्त ३ धावांत ८ बळी टिपले. तर रोनिक हेडाऊने ६ धावांत २ बळी घेण्यात यश मिळवले. या दमदार कामगिरीसह, विदर्भाने एक डाव शिल्लक असताना ७६ धावांनी विजय आपल्या नावे केले.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी एक महिना बाकी असताना अनेक संघ आपापल्या तयारीला लागले आहेत. सोशल मिडियावर संघाच्या घोषणा करण्यात येत आहेत. तर काही खेळाडू हे विश्वचषकासाठी मैदानावर सराव करताना देखील पाहायला मिळत आहेत.दरम्यान, २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले असून वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्यासह टिम डेव्हिड यांचाही समावेश आहे. दरम्यान, मिचेल ओवेन आणि बेन द्वारशियस यांना अंतिम १५ संघातून वगळण्यात आले.






