Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष?

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 08, 2022 | 08:41 AM
माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष?
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता काहीच दिवसात संपणार आहे. तेव्हा बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष कोण होणार या संदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. सुरुवातीला अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar)  आणि माजी क्रिकेटर संदीप पाटील (Sandip Patil) यांच्यात चुरस रंगणार असे बोलले जात होते. मात्र आता एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी (Roger Binny) हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होणार आहेत.

भारताचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी हे १९८३ साली विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य होते. १८ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार अशा पाच पदांसाठी निवडणुका होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी बीसीसीआयचा अध्यक्ष होऊ शकतात. बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत रॉजर बिन्नी याचं नाव आघाडीवर आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या दिग्गजांची महत्वाची बैठक झाली. यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींची चर्चा झाली.

Former India cricketer Roger Binny frontrunner to replace Sourav Ganguly as next BCCI President, official decision to be taken soon: Sources (file photos) pic.twitter.com/iOE52UYxCt — ANI (@ANI) October 7, 2022

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नाही. जय शाह सचिवपदाची निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील चॅम्पियन खेळाडू रॉजर बिन्नी आणि काँग्रेस नेते राजीव शुल्का यांच्यापैकी एकजण बीसीसीआय अध्यक्ष, सचिव अथवा आयपीएल चेअरमन बनू शकतात. त्याशिवाय सध्याचे कोषाध्यक्ष अरुण ठाकूर पुन्हा एकदा या पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. अरुण ठाकूर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ आहेत.

रॉजर बिन्नीची क्रिकेट कारकीर्द :
अष्टपैलू रॉजर बिन्नीनं १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं २७ कसोटी सामन्यात ८३० धावा केल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. रॉजर बिन्नीनं कसोटीत ११ तर एकदिवसीय सामन्यात १२ झेल घेतले आहेत. रॉजर बिन्नीनं २७ कसोटीमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यात ७७ विकेट्स मिळवल्या आहेत. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी महत्वाचा भाग होता. या विश्वचषकात रॉजर बिन्नीनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

Web Title: Former cricketer roger binny will be the new president of bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2022 | 08:41 AM

Topics:  

  • Ashish Shelar
  • bcci
  • Jay shah
  • Roger Binny
  • Sandip Patil

संबंधित बातम्या

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
1

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 
2

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?
3

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 
4

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.