Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Player of the Month साठी नामांकन जाहीर! गार्डनर आणि वोल्वार्डसोबत ‘या’ भारतीय महिला खेळाडूची असणार स्पर्धा 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 06, 2025 | 06:13 PM
Nominations announced for ICC Player of the Month! Gardner and Wolvaard will compete with 'this' Indian women's player

Nominations announced for ICC Player of the Month! Gardner and Wolvaard will compete with 'this' Indian women's player

Follow Us
Close
Follow Us:
  • आयसीसीकडून ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ नामांकनाची घोषणा
  • पुरुष गटात मुथुसामी, नौमन अली आणि रशीद खान यांच्या नावाचा समावेश 
  • महिला गटात मानधना, वोल्वार्ड आणि गार्डनर शर्यतीत
Nominations announced for ICC Player of the Month : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धा अलीकडेच्या समाप्त झाली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिले विश्वचषक जेतेपद जिंकले. या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ नामांकनाची घोषणा केली. यादीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटातील खेळाडूंचा समावेश असून महिला गटात, भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचा समावेश आहे.

हेही वाचा : IND vs AUS 4th T20I : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर168 धावांचे लक्ष्य! नॅथन एलिसची धारधार गोलंदाजी

महिला गटात स्मृती मानधनाचा धूमधडाका

२०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जेतेपदावर भारताने आपले नाव कोरले. या स्पर्धेत भारताच्या जेतेपदाच्या विजयात स्मृती मानधनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे स्पर्धेत अनेक वेळा संघाला मजबूत आघाडी मिळवून देण्यात मदत झाली. स्मृती मानधनाने नऊ सामन्यांमध्ये ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे. तसेच नामांकनाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डनचे देखील नाव आहे. या विश्वचषकात वोल्वार्डनने ऑस्ट्रेलियासाठी उल्लेखनीय ५७१ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाची अ‍ॅशले गार्डनरनेही चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तीला देखील प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे.

पुरुष गटात तीन खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा

आयसीसीने पुरुष गटात ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन खेळाडूंना नामांकन दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा सेनुरन मुथुसामी, पाकिस्तानचा नौमान अली आणि अफगाणिस्तानचा रशीद खान, यांचा या यादीत समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज सेनुरन मुथुसामीने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले आहे. त्याने चेंडूने ११ बळी घेतले आणि फलंदाजीने १०६ धावा काढल्या आहेत.

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नौमान अलीने देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी करत एकूण १४ बळी टिपले.   दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खानने ऑक्टोबरमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरूपात प्रभावी कामगिरी केली. त्याने टी-२० सामन्यांमध्ये ९ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहे.

हेही वाचा : WPL 2026 : RCB मध्ये बदलाला सुरुवात! मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक; सहा वर्षे सपोर्ट स्टाफचा भाग

आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या दोन्ही श्रेणींमध्ये स्पर्धा खूप मनोरंजक अशी  आहे. महिला गटात मानधना, वोल्वार्ड आणि गार्डनर शर्यतीत असणार आहेत. तर पुरुष गटामध्ये, मुथुसामी, नौमन अली आणि रशीद खान त्यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. त्यामुळे आता ऑक्टोबर २०२५ च्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून आहे.

Web Title: Gardner and wolvaard nominated for icc player of the month along with smriti mandhana marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • ICC
  • Laura Wolvaardt
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND W vs SL W : श्रीलंकेविरुद्धच्या शानदार विजयानंतरही, हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, “मला माहित नाही की आपण…”
1

IND W vs SL W : श्रीलंकेविरुद्धच्या शानदार विजयानंतरही, हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, “मला माहित नाही की आपण…”

स्मृती मानधनाने पुनरागमन करून रचला इतिहास! हा टप्पा गाठणारी ठरली ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू
2

स्मृती मानधनाने पुनरागमन करून रचला इतिहास! हा टप्पा गाठणारी ठरली ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

IND W vs SL W : चॅम्पियन महिला संघाची विजयी सुरुवात, पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 8 विकेट्सने केले पराभूत
3

IND W vs SL W : चॅम्पियन महिला संघाची विजयी सुरुवात, पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 8 विकेट्सने केले पराभूत

T20 World Cup साठी भारतीय संघात कधीपर्यंत करता येणार बदल? ICC चे नियम माहिती आहेत का? वाचा सविस्तर 
4

T20 World Cup साठी भारतीय संघात कधीपर्यंत करता येणार बदल? ICC चे नियम माहिती आहेत का? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.