भारताचे ऑस्ट्रेलियासमोर168 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 4th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज खेळला जात आहे. गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात नाणेफेक गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला ८ बाद १६७ धावांवर रोखले. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ४६ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने फायदेशीर गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाची सुरुवात छानगली झाली. पहिल्या पॉवरप्लेमध्ये ४९ धावा केल्या होत्या. भारताने पहिली विकेट ५६ धावांवर गमावली. भारताला अभिषेक शर्माच्या रूपात पहिला मोठा धक्का बसला आहे. शर्माने २१ चेंडूत २८ धावा काढल्या आणि त्यानंतर तो अॅडम झंपाने बाद केले.
त्यानंतर शिवम दुबे फलंदाजीसाठी आला. दुबेला २२ धावांवर नाथन एलिसने बाद केले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आहे. त्यानंतर शुभमन गिलच्या रूपात तिसरा धक्का बसला आहे. गिल ३९ चेंडूत ४६ धावा करून माघारी परतला. त्याला नाथन एलिसने बाद केले. कर्णधार सूर्यकुमार यादव २० धावा करून माघारी गेला. तिलक वर्मा ५, वॉशिंग्टन सुंदर १२, जितेश शर्मा ३ धावा करून बाद झाले तर अक्षर पटेल २१ धावा आणि वरुण चक्रवर्ती १ धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाकडून , नॅथन एलिस आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या तर झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : आशियाई कप पात्रता फेरीसाठी भारतीय संघाची घोषणा: बांगलादेशविरुद्ध ‘या’ फुटबॉल खेळाडूंची लागली वर्णी
मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशीस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झांपा.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
बातमी अपडेट होत आहे….






