रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
RCB gets new head coach : महिला प्रीमियर लीग चा चौथा हंगाम २०२६ मध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी या स्पर्धेची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे. या हंगामापूर्वी मेगा खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. त्यापूर्वी, ५ नोव्हेंबर रोजी, पाचही फ्रँचायझींनी त्यांच्या राखीव खेळाडूंना रिलीज केले. त्याचप्रमाणे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघानेही चार प्रमुख खेळाडूंना कायम ठेवण्यात आले. यामध्ये कर्णधार स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष आणि श्रेयंका पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. या चार खेळाडूंनी गेल्या हंगामात संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती आणि आता फ्रँचायझी त्यांना पुढील हंगामासाठी कायम ठेवण्याच्या विचारात आहे.
हेही वाचा : आशियाई कप पात्रता फेरीसाठी भारतीय संघाची घोषणा: बांगलादेशविरुद्ध ‘या’ फुटबॉल खेळाडूंची लागली वर्णी
आरसीबीला मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक
आरसीबी फ्रँचायझीकडून आगामी हंगामासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाने ही जबाबदारी गेल्या सहा वर्षांपासून आरसीबी फ्रँचायझीच्या सपोर्ट स्टाफचा भाग असलेल्या मलोलन रंगराजन यांच्याकडे दिली आहे. मलोलन ही ल्यूक विल्यम्सची जागा घेणार आहेत. ज्यांनी त्यांच्या इतर कोचिंग जबाबदाऱ्यांमुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला.
मलोलन रंगराजन यांनी आरसीबी महिला संघासाठी स्काउटिंग प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका वठवली आहे. त्यांनी २०२५ च्या डब्लूपीएल हंगामात संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून देखील काम पहिले आहे. रंगराजन यांची क्रिकेट कारकीर्दही उल्लेखनीय राहिली आहे, त्यांनी ४७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १३६ विकेट्स मिळवल्या आहेत आणि १,३७९ धावा फटकावल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तामिळनाडू, उत्तराखंड आणि दक्षिण विभागातील संघांचे प्रतिनिधित्व केले. त्यांचा अनुभव आणि धोरणात्मक समज आगामी हंगामात आरसीबी महिला संघाला बळकटी देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
डब्ल्यूपीएल २०२५ मध्ये आरसीबी महिला संघाची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नव्हती, त्यामुळे फ्रँचायझीकडून त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्यात आले. यासाठी, संघाकडून इंग्लंडच्या माजी विश्वचषक विजेत्या वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोलला त्यांच्या प्रशिक्षक पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. श्रबसोलच्या समावेशामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे संघाच्या गोलंदाजी आक्रमणात देखील मोठा फायदा होईल. ती
हेही वाचा : IND vs AUS 4th T20I : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर168 धावांचे लक्ष्य! नॅथन एलिसची धारधार गोलंदाजी






