Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India Next Captain: भारताचा नवा कर्णधार ठरला? ऋषभ पंत नाही तर हा युवा खेळाडू असेल भावी कर्णधार?

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला असून ऋषभ पंतसह २३ वर्षीय युवा खेळाडूवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 14, 2025 | 03:18 PM
भारताचा नवा कर्णधार ठरला? ऋषभ पंत नाही तर हा युवा खेळाडू असेल भावी कर्णधार?

भारताचा नवा कर्णधार ठरला? ऋषभ पंत नाही तर हा युवा खेळाडू असेल भावी कर्णधार?

Follow Us
Close
Follow Us:

भारताला कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या २ मालिकांमध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील पराभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पराभवानंतर रोहित शर्माचं कर्णधारपद धोक्यात आलं आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही नव्या कर्णधाराचा शोध सुरू केला असून ऋषभ पंतसह २३ वर्षीय युवा खेळाडूवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

BCCI च्या आढावा बैठकीत योग्य उपकर्णधाराबाबतही चर्चा झाली. कसोटीशिवाय ३० वर्षांचा बुमराह वनडे आणि टी-२० मध्येही महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. अजित आगरकरच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने उपकर्णधार म्हणून ऋषभ पंतला पसंती दर्शवली आहे, पण गंभीरने यशस्वी जैस्वालचं नाव सूचवत त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भारताची भावी कसोटी उपकर्णधार यशस्वी जैस्वाल असण्याची शक्यता आहे.

दैनिक जागरणमधील नव्या रिपोर्टनुसार, रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार कोण असेल ही नावे समोर आली, पण अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात या नावावरून मतभेद असल्याचे समोर आलं आहे.

शनिवारी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत भावी कर्णधारावर चर्चा झाल्याचे वृत्त दैनिक जागरणने यापूर्वीच दिले होते. यामध्ये रोहित म्हणाला होता की, मी नवीन कर्णधार जोपर्यंत निवडला जात नाही, तोवर कर्णधार असेन. बुमराह हा भारताचा कसोटी कर्णधार होण्यासाठी आघाडीवर आहे, परंतु त्याच्या फिटनेसची चिंता पाहता, तो दीर्घकालीन पर्याय असल्याचे दिसत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत त्याने कर्णधारपद भूषवले, पण दुखापतीमुळे तो पाचवा सामना खेळू शकला नाही.

रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे, असा रिपोर्ट समोर आला होता. भारतीय संघाला जून-जुलैमध्ये मायदेशात इंग्लंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे. रोहित पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे बुमराह हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल. पण त्याच्या अनुपस्थितीत भारताचा असा उपकर्णधार संघ निवडत आहे जो संघाचे योग्य नेतृत्त्व करेल.

सूर्यकुमार यादव हा टी-२० संघाचा कर्णधार आहे. पण वनडे क्रिकेटमध्ये सूर्याला आपले स्थान अद्याप मिळवता आलेले नाही, त्यामुळे तो वनडेमध्ये संघाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता फारच कमी आहे. तीन फॉरमॅटमध्ये तीन कर्णधार असणं योग्य नसेल. त्यामुळे बुमराह एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये कर्णधाराची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक योग्य उपकर्णधार निवडणं महत्त्वाचं असणार आहे. जेणेकरून जेव्हा बुमराहला विश्रांती दिली जाईल तेव्हा उपकर्णधार कर्णधार म्हणून संघाचे योग्य नेतृत्त्व करेल.

Web Title: Gautam gambhir wants yashasvi jaiswal as next team india captain after rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • Rishabh Pant
  • Team India Captain

संबंधित बातम्या

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
1

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
2

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

ऋषभ पंतला राग का आला? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने खळबळ
3

ऋषभ पंतला राग का आला? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने खळबळ

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?
4

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.