Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs SRH : Jos Buttler ने करून दाखवलं! IPL च्या इतिहासात सर्वात जलद केली ‘ही’ कामगिरी.. 

आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात अर्धशतक लगावणाऱ्या जोस बटलरने मोठी कामगिरी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 03, 2025 | 06:00 PM
GT vs SRH: Jos Buttler did the trick! The fastest performance in the history of IPL..

GT vs SRH: Jos Buttler did the trick! The fastest performance in the history of IPL..

Follow Us
Close
Follow Us:

GT vs SRH : आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने  सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि जोश बतलर यांनी शानदार अर्धशतके लागावली. या दोघांच्या  अर्धशतकांच्या जोरवार गुजरात संघ २०० धावांचा पल्ला ओलांडू शकला. या सामन्यात जोस बटलरने आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. जोस बटलर ४००० धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे. याशिवाय, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला.

जोस बटलरने आपल्या ११७ व्या आयपीएल सामन्याच्या ११६ व्या डावामध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान, बटलर ४००० धावा करणारा चौथा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. केएल राहुल, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. बटलरला हे यश मिळवण्यासाठी फक्त १२ धावांची आवश्यकता होती. त्याने झीशान अन्सारीच्या चेंडूवर हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा : GT vs SRH : Sai Sudarshan चा IPL मध्ये डंका! रचला मोठा इतिहास, असे करणारा जागतिक क्रिकेटमध्ये ठरला पहिलाच भारतीय..

आयपीएलमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा

  1. जोस बटलर (MI/RR/GT) – ४०००*
  2. जॉनी बेअरस्टो (पीबीकेएस/एसआरएच) – १५८९
  3. इऑन मॉर्गन (केकेआर/केएक्सआयपी/आरसीबी/एसएलआरएच) – १४०५
  4. मोईन अली (सीएसके/केकेआर/आरसीबी) – ११६७
  5. लियाम लिव्हिंगस्टोन (PBKS/RCB/RR)  1026
  6. केविन पीटरसन (डीसी/आरसीबी/आरपीएस) – १००१
  7. सॅम करन (सीएसके/पीबीकेएस) -९९२
  8. बेन स्टोक्स (सीएसके/आरपीएस/आरआर) – ९३५
  9. फिल साल्ट (डीसी/केकेआर/आरसीबी) – ८९२
  10. जेसन रॉय (डीसी/जीएल/केकेआर/एसआरएच) – ६१४
  11. रवी बोपारा (केएक्सआयपी/एसएलआरएच) – ५३१

आयपीएल मध्ये सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर नोंदवला आहे. केएल राहुलने त्याच्या १०५ व्या डावात ही कामगिरी करून दाखवली आहे. तर गेलने ११२ डावांमध्ये आणि डेव्हिड वॉर्नरने ११४ व्या डावात ही कामगिरी केली आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद ४००० धावा (डावानुसार)

  1. केएल राहुल (RCB/SRH/PBKS/LSG/DC) -105
  2. ख्रिस गेल (केकेआर/आरसीबी/पीबीकेएस) -११२
  3. डेव्हिड वॉर्नर (डीसी/एसआरएच)- ११४
  4. जोस बटलर (एमआय/आरआर/जीटी) – ११६
  5. फाफ डु प्लेसिस (RPSG/CSK/RCB/DC) -121
  6. विराट कोहली (आरसीबी) – १२८

आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत ४००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.  बटलरने २६७७ चेंडूत ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. गेलने २६५३ चेंडूतच ४००० धावांचा टप्पा गाठला होता. तर एबी डिव्हिलियर्सने २६५८ चेंडूत ही कामगिरी केली होती. या यादीत सूर्यकुमार यादव २७१४ चेंडूंसह चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा : ‘मला कोणतीही नोटीस मिळाली नाही’ KCA ने लादलेल्या 3 वर्षांच्या बंदीबाबत श्रीशांतने सोडले मौन

आयपीएलमध्ये सर्वात जलद ४००० धावा (चेंडूंच्या बाबतीत)

  1. ख्रिस गेल (केकेआर/आरसीबी/पीबीकेएस) -२६५३
  2. एबी डिव्हिलियर्स (डीसी/आरसीबी) -२६५८
  3. जोस बटलर (एमआय/आरआर/जीटी)- २६७७
  4.  सूर्यकुमार यादव (MI/KKR) -2714
  5. डेव्हिड वॉर्नर (डीसी/एसआरएच) -२८०९

Web Title: Gt vs srh jos buttler did the biggest performance in the history of ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • GT vs SRH
  • IPL 2025
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!
3

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.