फोटो सौजन्य - sreesanthnair36 सोशल मीडिया
श्रीशांतवर तीन वर्षांची बंदी : इंडियन प्रिमियर लीग २०२५ चा हा १८ वा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आहेत. या सीझनमध्ये सहभागी झालेल्या १० संघानी प्लेऑफच्या दिशेने जाण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या सीझनचा विजेता कोण होणार यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या वर्षाच्या सुरुवातीला संजू सॅमसनला पाठिंबा दिल्याबद्दल आणि केसीएविरुद्ध वक्तव्य केल्याबद्दल केरळ क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली होती अशी माहिती समोर आली होती.
३० एप्रिल रोजी एर्नाकुलम येथे झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पण आता, निलंबनाच्या अवघ्या दोन दिवसांनंतर, श्रीशांतने दावा केला आहे की त्याला केसीएकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत असे त्याने स्पष्ट केले आहे. श्रीशांतला सॅमसनला पाठिंबा दिल्याबद्दल नव्हे तर असोसिएशनविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल निलंबित करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. वृत्तसंस्था एएनआयनुसार, श्रीसंतने दावा केला की कारवाई कोणत्या आधारावर करण्यात आली हे त्याला माहित नाही. तो म्हणाला की तो फक्त एका राज्यातील क्रिकेटपटूला पाठिंबा देत आहे. त्याने दावा केला की त्याला केसीएकडून कोणतीही सूचना मिळाली नव्हती आणि त्याच्या निलंबनाबद्दल फक्त माध्यमांकडूनच ऐकले होते.
The KCA issued a show cause notice to Sreesanth, for his remarks linking the state cricket body and Sanju Samson :
“Someone like Sreesanth does not need to ‘protect’ Kerala’s players,” pic.twitter.com/HYUUuPVp1Q
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) February 8, 2025
श्रीशांत म्हणाला, “मला केसीएकडून कोणतीही सूचना किंवा आदेश मिळालेला नाही. आम्हाला त्याबद्दल फक्त माध्यमांकडूनच कळले आहे. कारवाई कोणत्या आधारावर करण्यात आली आहे हे मला अद्याप माहित नाही. मी फक्त एका राज्य क्रिकेटपटूला पाठिंबा देत होतो. एकदा आम्हाला सूचना दिसली की, आम्ही आमच्या पर्यायांवर विचार करू.”
या वर्षाच्या सुरुवातीला विजय हजारे ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी संघातून वगळल्यानंतर श्रीशांतने विकेटकीपर फलंदाज सॅमसनला पाठिंबा दिला होता आणि त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. श्रीशांत व्यतिरिक्त, केसीएने सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाईची मागणी केली. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी केसीएवर त्यांच्या मुलाच्या कारकिर्दीला हानी पोहोचवल्याचा जाहीर आरोप केला होता.