Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT vs SRH : Sai Sudarshan चा IPL मध्ये डंका! रचला मोठा इतिहास, असे करणारा जागतिक क्रिकेटमध्ये ठरला पहिलाच भारतीय.. 

आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. या सामन्यात २३ चेंडूत ४८ धावांची खेळी करणाऱ्या साई सुदर्शनने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 03, 2025 | 11:46 AM
GT vs SRH: Sai Sudarshan's dunk in IPL! Created big history, became the first Indian in world cricket to do so..

GT vs SRH: Sai Sudarshan's dunk in IPL! Created big history, became the first Indian in world cricket to do so..

Follow Us
Close
Follow Us:

GT vs SRH :  आयपीएल २०२५ चा ५१ वा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि  सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरात संघाने २०० चा आकडा पार केला. या सामन्यात गुजरातच्या साई सुदर्शनची २३ चेंडूत ४८ धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. या खेळीसह त्याने खास कामगिरी केली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.

तमिळनाडूचा डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने ५५ व्या टी-२० सामन्याच्या ५४ व्या डावात २००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने कमी डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.  . तो ५३ व्या डावात २००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला होता.

आयपीएलमध्ये सर्वात जलद २००० धावा (डावानुसार)

  1. शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया) – ५३
  2. बी साई सुदर्शन (भारत) -५४
  3. ब्रॅड हॉज (ऑस्ट्रेलिया) -५८
  4. मार्कस ट्रेस्कोथिक (इंग्लंड) – ५८
  5. मुहम्मद वसीम (संयुक्त अरब अमिराती) – ५८
  6. सचिन तेंडुलकर (भारत) – ५९
  7. डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया) – ५९

हेही वाचा : ‘मला कोणतीही नोटीस मिळाली नाही’ KCA ने लादलेल्या 3 वर्षांच्या बंदीबाबत श्रीशांतने सोडले मौन

शुक्रवारी झालेल्या सामन्यात साई सुदर्शनला  टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ३२ धावांची आवश्यकता होती.  त्याने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर एक धाव घेत ही कामगिरी पूर्ण केली. त्याने डावाच्या पाचव्याच षटकात ही कामगिरी करून इतिहास रचला. याआधी तो सर्वात जलद १५०० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

साई सुदर्शनच्या जलद १५०० धावा..

टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापूर्वीच साई सुदर्शनने गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये १५०० धावा केल्या. त्याने ही कामगिरी  फक्त ३५ सामन्यांमध्ये केली. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडीत काढला,  ज्याने आयपीएलमध्ये ४४ डाव खेळून १५०० धावा केल्या होत्या. आता सुदर्शन आयपीएलमध्ये सर्वात जलद १५०० धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.

हेही वाचा : ‘क्रिकेट किटमधील हेल्मेटप्रमाणे मीडिया आणि तंत्रज्ञानाचा…’, माजी प्रशिक्षक Ravi Shastri यांचा खेळाडूंना सल्ला

आयपीएल २०२५ मध्ये साई सुदर्शन फॉर्म सुसाट..

या वर्षीच्या म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये टॉप जीटी आणि एकूण सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. त्याने आयपीएल २०२५ हंगामाची सुरुवात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (७४) आणि मुंबई इंडियन्स (६३) विरुद्ध सलग दोन अर्धशतके लगावत धमकेदार सुरवात केली होती. त्यानंतर २ एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध ४९ धावांची खेळी केली होती.

Web Title: Gt vs srh sai sudarshan created history in ipl becoming the first indian in world cricket to do so

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • GT vs SRH
  • IPL 2025
  • IPL records
  • Sai Sudarshan
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
1

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
2

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज
3

IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज

IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी
4

IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.