Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Making Of A Cricketer: वडिलांचा त्याग अन् Yastika ची अपार मेहनत; अशी बनली वडोदराची लेक टीम इंडियाची ‘स्टार’

क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये यास्तिकाने शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर चांगला खेळ केला. तिथे तिने आपली ओळख निर्माण केली. वडोदराची लेक आज भारतीय संघात डावखुरी फलंदाज म्हणून खेळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 03:32 PM
The Making Of A Cricketer: वडिलांचा त्याग अन् Yastika ची अपार मेहनत; अशी बनली वडोदराची लेक टीम इंडियाची ‘स्टार’
Follow Us
Follow Us:
  • यास्तिका भाटीयाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड 
  • 11 व्या वर्षी अंडर 19 संघात झाली निवड 
  • सध्या भारतीय संघात डावखुरी फलंदाज अन् विकेटकीपर म्हणून संधी
Yastika Bhatia/तेजस भागवत: आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. भारताने सलग दोन सामने जिंकले आहेत. सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. मात्र या संघात असणाऱ्या एका शानदार खेळाडूच्या संघर्षाची कहाणी आज आपण ‘द मेकिंग ऑफ अ क्रिकेटर‘ या सिरिजमधून जाणून घेणार आहोत. भारतीय महिला क्रिकेट संघातील विकेटकीपर आणि फलंदाज असणारी यास्तिका भाटियाच्या आयुष्याची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.

गुजरात राज्यातील बडोदरा येथे यास्तिका भाटियाचा जन्म 1 नोव्हेंबर 2000 रोजी झाला. लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात तिला आवड निर्माण झाली होती. ही क्षेत्र मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या यास्तिका भाटियाच्या जगण्याचा ध्यास आणि श्वास दोन्ही होते. अनेक खेळांमध्ये तिला आवड होती. मात्र तिच्यातील करीकट खेळण्याची तिची क्षमता टियाच्या वडिलांनी ओळखली होती.

क्रिकेटची सुरुवात कशी झाली?

यास्तिका भाटिया अनेक खेळांमध्ये पारंगत होती. मात्र तिच्या वडिलांनी तिच्यातील क्रिकेट खेळण्याची क्षमता व त्याप्रती असलेली ओढ ओळखली आणि वयाच्या 8 व्या वर्षी वडोदरा क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये तिला प्रवेश घेऊन दिला. तिच्या वडिलांनी यास्तिकावर जो विश्वास दाखवला होता तो यास्तिकाने खरा करून दाखवला आहे. अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज यास्तिका भारतीय महिला क्रिकेट संघातून खेळताना दिसत आहे. क्रिकेट विश्वात स्वतःच्या जबरदस्त कामगिरीने तिने स्वतःला सिद्ध केले आहे.

The Making Of A Cricketer: भावाचे शूज अन् उसनी जर्सी; Kranti Goud चा टीम इंडियापर्यंत प्रवास, वाचा संघर्ष कहाणी

क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये यास्तिकाने शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर चांगला खेळ केला. तिथे तिने आपली ओळख निर्माण केली. वडोदराची लेक आज भारतीय संघात डावखुरी फलंदाज म्हणून खेळत आहे. कोचिंग सेंटरमध्ये यास्तिकामधील क्रिकेट खेळण्याची क्षमता तिच्या प्रशिक्षकांनी ओळखली आणि तिथूनच तिचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला ती गोलंदाजी करत असे. मात्र तिच्या प्रशिक्षकांनी तिची हुशारी आणि चपळता पाहून विकेटकीपरिंग करण्याचा सल्ला दिला. हाच सल्ला यास्तिकाच्या क्रिकेट करियरला कलाटणी देणारा ठरला.

यास्तिकाची वयाच्या 11 व्या वर्षी बडोदराच्या अंडर 19 संघात निवड झाली. तिथे तिने शतकी खेळीसह अनेक महत्वपूर्ण आशा खेळी केल्या. यामुळे तिने स्वतःची वेगगली ओळख निर्माण केली. मात्र टीम इंडियात प्रवेश करण्याचा तिचा प्रवास सहज नक्कीच नव्हता. टीम इंडियात निवड होण्यासाठी तिला आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागले.

The Making of a Cricketer: ‘प्लास्टिकची बॅट ते…’; इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्री चरणीच्या रूपाने उमललं ‘सुवर्णकमळ’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवल्यावर तिला भारत अ संघात स्थान मिळाले. 2021 मध्ये पहिल्यांदा भारतीय संघातून खेळली. यावर्षीच तिने एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केले. महिला प्रीमियर लीगमधून खेळताना ती मुंबई इंडियन्ससंघाकडून खेळत होती. स्थानिक क्रिकेटपासून संघर्ष करत भारतीय महिला संघात निवड होण्याचा यास्तिकाचा प्रवास थक्क करणारा आहे. समर्पण, संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने स्वतःला घडवले आहे.

Web Title: Gujarat vadodara yastika bhatiya cricket career story to enter team india the making of a cricketer t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • The Making of A Cricketer
  • Yastika Bhatia

संबंधित बातम्या

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा
1

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
2

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
3

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.