Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurnoor Brar : गुरनूर ब्रारच्या भेदक गोलंदाजीसमोर किवी गारद! Zaheer Khanचा २३ वर्षांचा रेकॉर्ड एका स्पेलमध्ये उद्ध्वस्त

Gurnoor Brar Breaks Zaheer Khan’s 23-Year-Old Record: वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भेदक गोलंदाजी करत ३० धावा देत ४ विकेट्स घेतले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 08, 2026 | 12:43 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • गुरनूर ब्रारचा ऐतिहासिक धमाका
  • झहीर खानचा २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
  • गुरनूर ब्रारने ४ विकेट्स घेत रचला इतिहास
Gurnoor Brar: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात, युवा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने आपल्या भेदक गोलंदाजीने इतिहास रचला. गुरनूरच्या घातक गोलंदाजीसमोर किवी फलंदाजांनी गुडघे टेकले. गुरनूरने आपल्या १० षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ३० धावा देऊन चार विकेट्स घेतले.

या प्रभावी कामगिरीमुळे, गुरनूरने न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय वेगवान गोलंदाजाने केलेल्या दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या बाबतीत त्याने मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांसारख्या खेळाडूंना मागे टाकले. तसेच त्याने झहीर खालचा २३ वर्षे जुना विक्रमही मोडला.

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?

गुरनूर ब्रारने न्यूझीलंडमध्ये ४ विकेट्स घेऊन इतिहास रचला

गुरनूर ब्रारने सामन्याच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला. त्याची पहिली पाच षटके उत्कृष्ट होती.यामध्ये त्याने केवळ सहा धावा देऊन दोन विकेट्स घेतले. त्याने आपल्या पाचव्या षटकात टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांना बाद करून किवींचे कंबरडे मोडले. त्यानंतर गुरनूरने किवी कर्णधार मिचेल सँटनर आणि नॅथन स्मिथ यांना बाद केले. गुरनूरने १० षटकांत  ४ विकेट्स घेत न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

यासह, गुरनूरने न्यूझीलंडमधील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. त्याने, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग सारख्या गोलंदाजांना मागे टाकले. या यादीत माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ अव्वल स्थानी आहे. जवागलने २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २३/४ अशी कामगिरी नोंदवली होती.

न्यूझीलंडमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजाची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय कामगिरी

  • जवागल श्रीनाथ – ४/२३ ऑकलंड २००३
  • गुरनूर ब्रार – ४/३० वेलिंग्टन २०२६
  • जवागल श्रीनाथ – ४/५२ नेपियर १९९५
  • मोहम्मद शमी – ४/५५ नेपियर २०१४
  • अर्शदीप सिंग – ४/७० ऑकलंड २०२६

झहीर खानचा २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

गुरनूर ब्रारने न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये एका भारतीय वेगवान गोलंदाजाच्या सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरीचा नवा विक्रमही प्रस्थापित केला. याशिवाय, त्याने महान भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानचा २३ वर्षे जुना विक्रम मोडला. झहीरने २००३ मध्ये वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३० धावांत ३ विकेट्स घेतले होते. पण आता गुरनूरने वेलिंग्टनमध्ये ४ विकेट्स घेऊन त्याला मागे टाकले आहे. न्यूझीलंडच्या भूमीवरील भारतीय गोलंदाजांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या यादीत गुरनूर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता, केवळ अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ त्याच्या पुढे आहेत.

न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय कामगिरी

  • अनिल कुंबळे – ५/३३ – वेलिंग्टन, १९९४
  • जावगल श्रीनाथ – ४/२३ – ऑकलंड, २००२
  • गुरनूर ब्रार -४/३० – वेलिंग्टन, २०२६
  • कुलदीप यादव – ४/३९ – नेपियर, २०१९
Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा

Web Title: Gurnoor brar 4 wickets breaks zaheer khan record ind vs nz 2nd odi 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Gurnoor Brar
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Zaheer Khan

संबंधित बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?
1

IND vs NZ: न्यूझीलंडचा सुपडासाफ करण्याची संधी! टीम इंडिया मालिका खिशात घालणार? तिसऱ्या वनडेचा थरार कधी अन् कुठे रंगणार?

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
2

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी
3

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी

IND Vs NZ: गुरनूर ब्रारने काढला किवींचा धूर! दुसरा सामना जिंकण्यासाठी भारताला केवळ 135 धावांची गरज
4

IND Vs NZ: गुरनूर ब्रारने काढला किवींचा धूर! दुसरा सामना जिंकण्यासाठी भारताला केवळ 135 धावांची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.