Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

Rohit Sharma breaks Highest Sixes giants New Zealand in odi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना वेलिंग्टनमध्ये खेळला गेला. या सामन्यात, रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 08:24 PM
Rohit Sharma

Rohit Sharma

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माचा षटकारांचा धमाका
  • शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे
  • न्यूझीलंडविरुद्ध रचला षटकारांचा विश्वविक्रम
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनमध्ये खेळला गेला. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच विकेट्सने जिंकला होता. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील रोहित स्वस्तात बाद झाला. त्याने २३ धावा केल्या. परंतु, रोहितने या खेळीत दोन षटकार मारून इतिहास रचला. त्याने महान पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडला. ( Rohit Sharma)

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

रोहित शर्माने रचला आणखी एक रेकॉर्ड

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने २८ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो आता पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला आहे. आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्ध ५० षटकार मारले होते. आता, रोहितने त्याला मागे टाकले आहे. वेलिंग्टन एकदिवसीय सामन्यापूर्वी, त्याने न्यूझीलंडविरुद्ध ४९ षटकार मारले होते. रोहितने आता ५१ षटकारांचा टप्पा गाठला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ४५ षटकारांसह वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने या सामन्यात आणखी एक विक्रम केला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन संघांविरुद्ध ५० पेक्षा जास्त षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहितने शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९३ षटकार मारले आहेत. याशिवाय, त्याने श्रीलंकेविरुद्ध ५८ षटकार मारले आहेत. आता, त्याने न्यूझीलंडविरुद्ध ५० षटकारांचा टप्पा ओलांडला आहे.

विराटने रिकी पाँटिंगचा विक्रमही मोडला

दुसऱ्या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तो ७ धावांवर बाद झाला. मात्र, त्याने एक विशेष कामगिरी केली आहे. तो आता न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. पाँटिंगला मागे टाकण्यासाठी त्याला फक्त एका धावेची गरज होती. कोहलीने आता न्यूझीलंडविरुद्धच्या ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९७८ धावा केल्या आहेत.

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी

Web Title: Ind vs nz rohit sharma breaks shahid afridi most sixes against nz record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Hitman Rohit Sharma
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी
1

IND vs NZ : पावसाचा खेळ पण भारताचा विजयरथ सुसाट! दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडला धोबीपछाड, मालिकेत 2-0 ने आघाडी

IND Vs NZ: गुरनूर ब्रारने काढला किवींचा धूर! दुसरा सामना जिंकण्यासाठी भारताला केवळ 135 धावांची गरज
2

IND Vs NZ: गुरनूर ब्रारने काढला किवींचा धूर! दुसरा सामना जिंकण्यासाठी भारताला केवळ 135 धावांची गरज

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
3

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…
4

IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.