Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Chris Gayle : कचरा उचलणारा आज ३७७ कोटींचा मालक, वाचा महान क्रिकेटरबद्दल

वेस्ट इंडिजचा दिग्गज विस्फोटक फलंदाज क्रिस गेल जगाराभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जागतिक कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले आहेत. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि 'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाचा त्याचा जीवन प्रवासाबद्दल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 21, 2024 | 12:00 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

हॅप्पी बर्थडे क्रिस गेल : वेस्ट इंडिज संघ म्हंटल की डोळ्यासमोर येते ती त्यांची विस्फोटक फलंदाजी. वेस्ट इंडिजचा संघ आता जरी कमकुवत असला पण एकेकाळी त्यांच्या संघाने जगभरामध्ये थैमान घातलं होत. वेस्ट इंडिजच्या संघामधील खेळाडूंसमोर समोरच्या विरोधकांना घाम येत असे. वेस्ट इंडिजचा दिग्गज विस्फोटक फलंदाज क्रिस गेल जगाराभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जागतिक कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले आहेत. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस गेलला समोर पाहून चांगले गोलंदाज आपली लाईन आणि लेन्थ विसरायचे.

वाचा दिग्गज फलंदाजाबद्दल

वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलचा जन्म १ सप्टेंबर १९७९ रोजी किंग्स्टन, जमैका येथे झाला. ख्रिस गेलने वेस्ट इंडिजसाठी ४८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.ख्रिस गेलने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले. ज्यामध्ये कसोटीतील त्रिशतक, वनडेतील द्विशतक आणि T२० मधील अनेक शतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानावर गेलची कामगिरी अगणित आहे. ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. T२० फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर गेलने या फॉरमॅटमध्ये १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि १,००० हून अधिक षटकार ठोकले आहेत.

वाचा क्रिस गेलची कथा

ख्रिस गेलची गोष्ट गरिबीतून उठून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनण्याची आहे. ख्रिस गेलला त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून विकायच्या होत्या. या काळात तो एका झोपडीत राहत असे. ख्रिस गेलने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या संघर्षाची कहाणी सांगितली होती. ख्रिस गेलच्या म्हणण्यानुसार, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चिप्स विकायची. मुलभूत गरजांसाठी झगडत असताना आणि लहानपणी अत्यंत गरिबीचा सामना करूनही ख्रिस गेलने हिंमत गमावली नाही. जिथे एकेकाळी भुकेमुळे चोरी करावी लागायची तिथे आता तो गरिबांना पोट भरण्याचे काम करतो. आज ख्रिस गेल आपल्या कुटुंबासोबत खूप छान आयुष्य जगत आहे. त्यांची एकूण संपत्ती ३७७ कोटी रुपये आहे. रॅगपिकर होण्यापासून ते क्रिकेट सुपरस्टार बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Happy birthday chris gayle know universal boss journey from being ragpicker to the owner of 377 crores wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • cricket
  • West Indies

संबंधित बातम्या

Kunar Earthquake : अफगाणिस्तान क्रिकेटने कुनार भूकंपग्रस्तांना पुढे केला मदतीचा हात, CSK च्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मने
1

Kunar Earthquake : अफगाणिस्तान क्रिकेटने कुनार भूकंपग्रस्तांना पुढे केला मदतीचा हात, CSK च्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मने

UP T20 League : 4 प्लेऑफचे संघ पक्के! जाणून घ्या रिंकू सिंगची टीम कोणाविरुद्ध खेळणार?
2

UP T20 League : 4 प्लेऑफचे संघ पक्के! जाणून घ्या रिंकू सिंगची टीम कोणाविरुद्ध खेळणार?

IPL मधून निवृत्त झाल्यानंतर R Ashwin आता या स्पर्धेत खेळणार? मिळणार करोडो रुपये…
3

IPL मधून निवृत्त झाल्यानंतर R Ashwin आता या स्पर्धेत खेळणार? मिळणार करोडो रुपये…

8 चेंडू, 7 षटकार…Kieron Pollard चा नाद नाय! मैदानावर पाडला धावांचा पाऊस; दाखवला षटकारांचा ‘सिनेमा’
4

8 चेंडू, 7 षटकार…Kieron Pollard चा नाद नाय! मैदानावर पाडला धावांचा पाऊस; दाखवला षटकारांचा ‘सिनेमा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.