IND VS AUS: 'Question mark on Virat's fitness...', Harbhajan Singh's prediction before the series against Australia
Harbhajan Singh’s comment on Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी खेळली जात आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्माची पुनरागमन करणार आहे. या जोडीबद्दल सध्या खूप काही बोललं जात आहे. अशातच या अनुभवी दिग्गज जोडीबद्दल आता भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने भाष्य केले आहे. त्याचे म्हणणे आहे की ही जोडी या मालिकेत भरपूर धावा करेल. कोहली आणि रोहित ही जोडी या वर्षी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताच्या जर्सीमध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे.
हरभजन सिंग म्हणाला की “विराटच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू करणे योग्य नाही. तो फिटनेसच्या बाबतीत गुरु असून प्रत्येकजण त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करत असतो. तो तंदुरुस्त असून कदाचित त्याच्या अनेक सहकाऱ्यांपेक्षा अधिक तंदुरुस्त आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तो कदाचित सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. आता, मी विराटला पुन्हा मैदानावर पाहण्याची उत्सुकता बाळगून आहे,”
हेही वाचा : IND vs WI, 2nd Test मियाँ मॅजिक चल गया..! मोहम्मद सिराजने घातला धुमाकूळ; २०२५ मध्ये केला ‘हा’ कारनामा
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, “चाहत्यांनी त्याला पाहण्याची आठवण काढली आहे आणि वैयक्तिकरित्या, मला देखील त्याला आणखी काही काळ एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पाहायला आवडेल कारण त्याच्याकडे अजून देखीलबरेच काही आहे. जेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हा मला खरोखर वाटले की त्याच्याकडे फक्त खेळण्यासाठीच नाही तर वर्चस्व गाजवण्यासाठी चार किंवा पाच वर्षे अजून देखील शिल्लक आहेत, कारण तो अशा प्रकारचा फलंदाज आहे की, ऑस्ट्रेलियाला जात आहे, फलंदाजीसाठी त्याचे ते आवडते ठिकाण आहे आणि मला खात्री आहे की तो पुन्हा एकदा तेथे त्याचे कौशल्य नक्की दाखवेल.”
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, कोहली एकदिवसीय मालिकेमध्ये दोन शतके झळकावेल कारण त्याला ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करायला खूप आवडते. “काही खेळाडू कठीण काळात चांगले प्रदर्शन करतात. विराट कोहली असाच एक खेळाडू असून तो मोठ्या प्रसंगी चमकतो आणि हेच त्याला वेगळे इतरांपासून वेगळे करते. तो त्या मोठ्या क्षणांची, त्या दबावाने भरलेल्या सामन्यांची वाट पाहतो आणि तेव्हाच तो दाखवून देतो की तो चॅम्पियन का आहे.?”
हेही वाचा : Ind vs WI : चेंडू लागताच बॅट हातातून निसटली, KL Rahul झाली नको तिथे दुखापत; पहा VIDEO