फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
हार्दिक पंड्याची कामगिरी : भारताचा संघ सध्या दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहे. यामध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सामन्यांमध्ये शतक ठोकले त्यानंतर त्याचे सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. तर T२० विश्वचषकामध्ये त्याचबरोबरोबर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे जसप्रीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. पण हार्दिक पंड्याने भारतीय संघासाठी ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, त्याचे श्रेय त्याला बऱ्याचदा मिळाले नाही. हार्दिक पंड्याने बऱ्याचदा भारतीय संघाला गमावलेला सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्याने फक्त फलंदाजीमध्ये नाही तर गोलंदाजीमध्ये सुद्धा टीम इंडियासाठी हटके कामगिरी केली आहे.
आता हार्दिक पंड्याच्या संदर्भात टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो की, २०२४ मध्ये T२० विश्वचषकामध्ये जर हेनरिक क्लासेनचा विकेट जर हार्दिक पंड्याने घेतला नसता तर भारताच्या संघाने विश्वचषक गमावला असता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर फलंदाजीला आला होता तेव्हा सुद्धा धावा झाल्या असत्या पण हार्दिक पंड्याने विकेट घेतला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना गमावला. एवढेच नव्हे तर आताचे उदाहरण घ्या जेव्हा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात मोहम्मद शामी जेव्हा मैदानाबाहेर गेला तेव्हा गोलंदाजी हार्दिक पंड्याने केली.
यावेळी संपूर्ण भारत चिंतेत होता. यावेळी भारताच्या संघाला पहिला विकेट आणि पाकिस्तानचा सर्वात मजबूत खेळाडू बाबर आझमचा विकेट हार्दिक पंड्याने घेतला आणि टीम इंडियाला पहिला विकेट मिळवून दिला. मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने कमालीची कामगिरी केली होती यामध्ये सुद्धा ४० धावा हार्दिक पंड्याने केल्या होत्या. यामध्ये त्याने फक्त फलंदाजीमध्येच नाही तर गोलंदाजीमध्ये सुद्धा भारतीय संघाला विकेट मिळवून देण्यात मोलाचे योगदान केले होते. आयसीसी इव्हेंट्समध्ये जगभरामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजांमध्ये हार्दिक पांड्याचे नाव अव्वल स्थानावर आहे.
भारताचा संघ पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये शेवटचा साखळी सामना २ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले आहे. सेमीफायनलचे सामने ४ मार्च आणि ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना ४ मार्च रोजी खेळवला जाणार आहे तर दुसरा सेमीफायनलचा सामना ५ मार्च रोजी होणार आहे.