
हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले (Photo Credit-X)
पाचव्या षटकादरम्यान पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफने आपला संयम गमावला आणि तो अभिषेक शर्माशी भिडण्यासाठी पोहोचला. अभिषेकने हारिस रौफच्या गोलंदाजीवर धडाकेबाज फलंदाजी केली होती, जी या वेगवान गोलंदाजाला आवडली नाही. हारिस रौफ आणि अभिषेक यांच्यातील वादामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, पंचांनी मध्यस्थी करून हा वाद शांत केला. याआधी शाहीन आफ्रिदी आणि शुभमन गिल यांच्यातही बाचाबाची झाली होती.
gill and abhishek shown aukat to this porki haris rauf#INDvPAK #AsiaCup pic.twitter.com/0QByqZnNE0 — SouLKirmada (@BabluuuuOp) September 21, 2025
पॉवरप्लेमध्ये अभिषेक आणि गिल यांनी भारताला शानदार सुरुवात करून दिली, ज्यामुळे भारताने ६ षटकांत कोणत्याही नुकसानशिवाय ६१ धावा केल्या होत्या. यानंतर दोघांनी शतकी भागीदारीही पूर्ण केली. या सामन्यात अभिषेक शर्माने केवळ २४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.
अभिषेकने या सामन्यात ५० षटकार पूर्ण करून एक विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी ३३१ चेंडूंमध्ये ५० षटकार पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.