
Rohit Sharma's fitness is on the rise! Has he even surpassed Virat Kohli? Have you seen 'Hitman's' super avatar? Watch the VIDEO.
Rohit Sharma’s practice video goes viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ तारखेपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळला जाणार आहे. या मालिकेपूर्वी अनुभवी भारतीय फलंदाज रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्मा चांगलीच तयारी करत आहे. दरम्यान, त्याचा सराव करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुभवी जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसणार आहे. अलिकडेच, रोहित शर्माने नेटमध्ये फलंदाजी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पूर्वीपेक्षा अधिक फिट असल्याचे दिसून येत आहे. चाहत्यांमध्ये त्याच्या फिटनेसबद्दल चर्चेने अधिक जोर पकडला आहे.
हेही वाचा : “हे सगळं काय आहे भाऊ..? Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ पाहून रविचंद्रन अश्विनही झाला अवाक
रोहित शर्माच्या नेटमध्ये फलंदाजी करतान असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडिओवर एकाने भाष्य करताना म्हटले की, व्हिडिओमध्ये रोहित विराट कोहलीपेक्षा बारीक दिसत आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, तो अगदी विराट कोहलीसारखा दिसतोय. म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rohit Sharma in the nets. pic.twitter.com/OsFnlwkg40 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 6, 2026
२०२५ या वर्षी रोहित शर्माने शानदार कामगिरी केली आहे. यावर्षी त्याने अनेक विक्रम रचले आहेत. कर्णधार म्हणून, त्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला जेतेपडद मिळवून दिले. तसेच या अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांची मॅचविनिंग इनिंग देखील खेळली होती. रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज देखील बनला.
रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा गाठला आहे. असा कारनामा करणारा चौथा भारतीय खेळाडू होण्याचा विक्रम केला आहे. गेल्या महिन्यात विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही किमया साधली होती.
नोव्हेंबरमध्ये, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने ३५२ वा षटकार ठोकून हा टप्पा गाठला होता. यामुळे शाहिद आफ्रिदीचा २०१५ पासूनचा ३५१ षटकारांचा विक्रम मोडला. रोहित शर्माने आता २७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५५ षटकार मारले लगावले आहेत.