वैभव सूर्यवंशी-रविचंद्रन अश्विन(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi-Ravichandran Ashwin : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. नुकत्याच दक्षिणनआफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. शेवटच्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने १२९ धावांची खेळी केली होती. दरम्यान, या १४ वर्षीय खेळाडूची कामगिरी बघून भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर एक विधान केले आहे. त्याने वैभवची कामगिरी “असाधारण” अशी म्हटली आहे.
हेही वाचा : अंकुश भारद्वाज कोण आहे? अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आहे आरोप; वाचा नेमकं प्रकरण काय?
अश्विनने सोशल मीडियावर लिहिले की, “X,” १७१(९५), ५०(२६), १९०(८४), ६८(२४), १०८(६१), ४६(२५), आणि १२७(७४). गेल्या ३० दिवसांत वैभव सूर्यवंशीचे देशांतर्गत आणि १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये या काही धावा आहेत. एन्ना ठांबी, इंदा आदि पोधुमा, इल्ला इनम कोंजम वेनुमा? (हे सगळं काय आहे भाऊ? हा नमुना पुरेसा आहे का, की तू पुढे जाणार आहेस?) वयाच्या १४ व्या वर्षी या मुलाने जे काही साध्य केले आहे ते शब्दांच्या पलीकडेचे आहे.” असे अश्विनने म्हटले आहे.
तसेच त्याने पुढे लिहिले आहे की, “अंडर १९ वर्ल्ड कप येत असून जिथे तो एक उत्कृष्ट फलंदाज होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून त्याच्या पहिल्या पूर्ण हंगामात संजूच्या मोठ्या शूजमध्ये प्रवेश करत आहे, वैभवचे पुढील चार महिने रोमांचक राहणार आहेत, जे त्याच्या स्वभावाबद्दल, भूकेबद्दल आणि चारित्र्याबद्दल सर्वकाही उघड करणार हे नक्की.”
171(95), 50(26), 190(84), 68(24), 108*(61), 46(25) & 127(74) today. These are just some of Vaibhav Suryavanshi’s scores in the last 30 days across domestic & U19 cricket. Enna thambi, indha adi podhuma, illa innum konjam venuma?
Translation ( what’s all this brother? Is this… pic.twitter.com/Udvb8HWiTn — Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 7, 2026
हेही वाचा : ‘बुमराहच्या प्रोत्साहनामुळे दुखापतीतून…’, भारताच्या अष्टपैलू श्रेयंका पाटीलने केला मोठा खुलासा
वैभव सुरवंशीने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत स्फोटक खेळी साकारल्या आहेत. वेगवेगळ्या खेळपट्ट्या आणि परिस्थितीत सातत्याने धावा काढत त्याने अंडर-१९ क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी एक मोठा दबदबा निर्माण केला आहे.
१९ वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीने त्याच्या पहिल्या मोठ्या कामगिरीमध्ये वैभवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या युवा एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात ६३ चेंडूत शानदार शतक झळकवले. त्याने १२७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० षटकार आणि ९ चौकारांची आतिषबाजी केली. त्याच्या खेळीने सामना भारताच्या बाजूने झुकला.






