Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

Hockey India removes Director Srivastava Saffron jersey row: २०२६ च्या हॉकी विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 04:05 PM
Hockey India removes Director Srivastava

Hockey India removes Director Srivastava

Follow Us
Follow Us:
  • हॉकी इंडियात मोठा वाद
  • भगव्या जर्सी प्रकरणावर दिलीप टिर्की अॅक्शन मोडमध्ये
  • DG आर.के. श्रीवास्तव यांचे अधिकार काढून घेतले
भारतीय हॉकी संघ अनेक वर्षांपासून निळ्या जर्सीमध्ये खेळत आहे. मात्र, हॉकी विश्वचषकादरम्यान जर्सीचा रंग अचानक भगवा करण्यात आला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आता, पुन्हा या वादात नवीन ठिणगी पडली आहे. भगव्या जर्सीच्या वादानंतर हॉकी इंडियाने आपले डायरेक्टर जनरल कमांडर (DG), आर. के. श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, त्यांचे सर्व अधिकार तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये श्रीवास्तव यांच्यावर एकूण आठ गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रतिसाद न दिल्यास, उपलब्ध नोंदींच्या आधारे पुढील कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

भगव्या रंगाच्या जर्सीवरुन वाद

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, श्रीवास्तव यांच्यावरील मुख्य आरोपांमध्ये भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलण्याचा समावेश आहे. पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगवा जर्सी आणण्यापूर्वी अध्यक्ष किंवा कार्यकारी समितीशी कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती. वारंवार विनंती करूनही, या निर्णयासंदर्भात कोणतेही अधिकृत कागजपत्रे किंवा मंजुरी सादर करण्यात आली नाही. जर्सीच्या रंगातील या बदलामुळे भारतीय क्रीडा विश्वात मोठा वाद निर्माण झाला.

हॉकी इंडियाने आपली जुनी, पारंपरिक निळी जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सी वापरण्यास सुरुवात केली. भारतीय संघाने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये झालेल्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेत याच भगव्या किटमध्ये सामने खेळले . जर्सी बदलण्यामागे असे कारण सांगितले गेले की, निळ्या रंगाच्या मैदानावर निळ्या रंगाचे कपडे घातलेले खेळाडू दिसणे आणि ओळखणे कठीण होते. परंतु, या नवीन बदलामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी या निर्णयाला उघडपणे विरोध केला.

आदेशांचे उल्लंघन आणि इतर गंभीर आरोप

कमांडर आर. के. श्रीवास्तव यांना भारताबाहेर प्रवास न करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना भारतातच राहून हॉकी इंडिया लीगच्या (HIL) तयारीवर आणि इतर बाबींवर लक्ष केंद्रित करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही त्यांनी अध्यक्षांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विश्वचषकासाठी नेदरलँड्स आणि बेल्जियमला ​​प्रवास केला. त्यांच्यावर इतरही अनेक आरोप आहेत, ज्यात एका जनसंपर्क संस्थेवर (PR agency) बंदी घालणे, खेळाडूंना वाईट वागणूक देणे, मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्याशी संबंधित वाद आणि बाहेरील संस्थांसोबत (जसे की FIH आणि AHF) अनधिकृतपणे चर्चा करणे या गोष्टींचा समावेश आहे. या आरोपांसह, आर. के. श्रीवास्तव यांच्यावर आठ गंभीर आरोप आहेत.

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर

Web Title: Hockey india saffron jersey row rk srivastava dilip tirkey action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey Team India
  • Hockey World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs PAK Hockey: कमाल! हॉकीच्या मैदानात भारताच्या मुलींनी पाकिस्तानचे वाजवले तीन तेरा, Pakistan ची लज्जास्पद कामगिरी
1

IND vs PAK Hockey: कमाल! हॉकीच्या मैदानात भारताच्या मुलींनी पाकिस्तानचे वाजवले तीन तेरा, Pakistan ची लज्जास्पद कामगिरी

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…
2

Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी
3

Nehru Hockey Tournament: नेहरू हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिरचा ‘दबदबा’! तिन्ही प्रमुख गटांत मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.