Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

India Beat Wales hockey world cup 2026: भारतीय हॉकी संघाने वेल्सविरुद्ध पूल डी मधील पहिला सामना ३-१ अशा फरकाने जिंकून हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये दमदार सुरुवात केली. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतीय संघासाठी सर्वाधिक दोन गोल केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 05:32 PM
Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाची विजयी गर्जना
  • वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात
  • तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा

भारताने हॉकी विश्वचषक ( Hockey World Cup 2026) स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या विश्वचषक २०२६ मोहिमेची सुरुवात दणदणीत विजयाने केली. स्वातंत्र्यदिनी भारताने पहिला सामना वेल्सविरुद्ध खेळला. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने वेल्सचा ३-१ ने पराभव केला आणि स्पर्धेत दमदार सुरुवात केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.बेल्जियम आणि नेदरलँड्स यांनी हॉकी विश्वचषक स्पर्धचे सह- आयोजन केले आहे.

IND vs SL Live: Devdutt Padikkal चा शतकी जलवा! 150 धावांचा टप्पा पार, श्रीलंकेच्या गोलंदाजांना घाम फोडला

भारतीय संघाने पहिल्याच क्वार्टरमध्ये केले दोन गोल

अॅमस्टेलवीन येथील वॅग्नर हॉकी स्टेडियमवर भारत आणि वेल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या क्वार्टरच्या ७व्या मिनिटाला सुमितने भारतासाठी पहिला गोल केला. ज्यामुळे भारताला १-० अशी आघाडी मिळाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने १०व्या मिनिटाला एका शानदार ड्रॅग-फ्लिकने ही आघाडी २-० अशी वाढवली. पहिल्या हाफच्या अखेरीस भारत २-० ने आघाडीवर होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला, ज्यामुळे त्यांनी स्वतः एकही गोल केला नाही आणि वेल्सलाही आपले खाते उघडण्याची संधी दिली नाही.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा

तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारतीय संघाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. ४३ व्या मिनिटाला, भारतीय कर्णधाराने गोल करण्याची एक सुवर्णसंधी साधून भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस, भारताने ३-० अशी आघाडी घेतली, ज्यामुळे विजय निश्चित झाला. चौथ्या क्वार्टरमध्ये वेल्सने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ५३ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु भारतीय डिफेन्सने धोका टाळला. परंतु, ५५ व्या मिनिटाला सॅम वेल्शने गोल करून स्कोअर ३-१ असा केला. त्यानंतर वेल्सने दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय संघाने शेवटच्या मिनिटांमध्ये आपला संयम राखला आणि त्यांना दुसरा गोल करण्यापासून रोखले.

भारताने दणदणीत विजय नोंदवला

अंतिम शिट्टी वाजताच भारताने हा सामना ३-१ ने जिंकला. हरमनप्रीत सिंगच्या शानदार दोन गोल्स आणि सुमितच्या एका गोलमुळे भारताला विश्वचषकात विजयी सुरुवात मिळाली. आता, भारतीय संघ हीच लय कायम ठेवून आपला ५१ वर्षांचा विश्वचषक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडिया आता विश्वचषकातील पुढचा सामना १७ ऑगस्ट रोजी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण सामना असेल.

WTC 2025-27: बांग्लादेशच्या विजयाने समीकरणं बदलली; ऑस्ट्रेलियाची बादशाही धोक्यात! भारतालाही टाकलं मागे

Web Title: Hockey world cup 2026 india beat wales 3 1 harmanpreet singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Hockey
  • Hockey World Cup 2026
  • Indian Men's Hockey Team

संबंधित बातम्या

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
1

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?
2

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन
3

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.