भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पावसामुळे पहिले संपूर्ण सत्र रद्द झाले होते, पण अखेरीस दुसऱ्या सत्रात खेळ पुन्हा सुरू झाला. यानंतर, पंत आणि पडिक्कल फलंदाजीसाठी आले. पंत आणि पडिक्कल एक मजबूत भागीदारी रचत होते. परंतु, ऋषभ पंतच्या रूपाने भारताला तिसरा झटका लागला. केशरा नुवान्थाने पंतला बाद करून ती भागीदारी तोडली. चार चौकार आणि एका षटकारासह ६२ चेंडूंमध्ये ३९ धावा करून पंत बाद झाला. पंत आणि पडिक्कल यांनी ७१ धावांची भागीदारी केली होती. केएल राहुलच्या रूपाने भारताला चौथा पराभव पत्करावा लागला. पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झालेला केएल राहुल आज फलंदाजीसाठी परतला. मात्र, १० चौकार आणि एका षटकारासह १७५ चेंडूंमध्ये ८२ धावा करून तो बाद झाला.
कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करणाऱ्या पडिक्कलने गॉल कसोटीच्या पहिल्याच दिवशी आपल्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने १३४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पडिक्कलने दिवसभर श्रीलंकेच्या गोलंदाजावर दबाव आणला. या २६ वर्षीय फलंदाजाने आपल्या संपूर्ण खेळीत अनेक शानदार फटके मारले आणि तो विशेषतः फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फंलदाजी केली. त्याने ८१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.देवदत्त पडिक्कलच्या शानदार नाबाद शतकामुळे भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली. शनिवारी दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या २ विकेट्स गमावून २८८ होती.
भारत – यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.
श्रीलंका – लाहिरू उदारा, निशान फर्नांडो, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो
Aus vs Ban: कांगारूंची शिकार! बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला घरातच लोळवलं; 9 विकेट्सने ऐतिहासिक विजय