Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hong Kong Sixes : ऑस्ट्रेलियाला नमवत अफगाणिस्तानने जिंकला जेतेपदाचा मान, इमरानची धुवांधार खेळी

Hong Kong Sixes : अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करत पहिल्यांदाच हाँगकाँग सिक्सेसचे जेतेपद पटकावले. इमरान मीरने 14 चेंडूंत नाबाद 53 धावांची वादळी खेळी केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 01, 2026 | 05:52 PM
Hong Kong Sixes : ऑस्ट्रेलियाला नमवत अफगाणिस्तानने जिंकला जेतेपदाचा मान, इमरानची धुवांधार खेळी

Hong Kong Sixes : ऑस्ट्रेलियाला नमवत अफगाणिस्तानने जिंकला जेतेपदाचा मान, इमरानची धुवांधार खेळी

Follow Us
Follow Us:
  • इमरानच्या 14 चेंडूंत 53 धावा
  • स्पर्धेत अफगाणिस्तान अपराजीत
  • फरमानुल्लाह सफीची दमदार फलंदाजी
 

अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेटने विजय मिळवत ‘हाँगकाँग सिक्सेस’ (Hong Kong Sixes) च्या आपल्या पहिल्या जेतेपदाला गवसणी घातली. रविवारी मिशन रोड ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 115/4 धावांवर रोखल्यानंतर अफगाणिस्तानने 5.1 षटकात विजय प्राप्त केला.

गुलबदीन नायबच्या नेतृत्त्वात अफगाणिस्तानही प्रतिष्ठीत ट्रॉफी जिंकणारा आठवा देश बनला आहे. त्याआधी पाकिस्तान, इंग्लंड, साउथ आफ्रिका, श्रीलंका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने देखील हे चषक पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 6 षटकांमध्ये 115/4 ही धावसंख्या उभारली होती. मॅक्स ब्रायंटने 14 चेंडूंत धुवांधार 44 धावा केल्या. त्याच्याशिवाय अॅलेक्स रयसने नाबाद 29 धावा आणि निक हॉब्सनने 23 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवले. अफगाणिस्तानकडून करीम जनत आणि नांगेलिया खरोटेने प्रत्येकी एक विकेट मिळवला.

Hong kong Sixes : सलग तीन पराभवानंतर भारताला सूर गवसला! बांगलादेशला 5 विकेट्सने नमवले

अफगाणिस्तानची विजयाला गवसणी

दरम्यान, अफगाणिस्तानने लक्ष्याचा पाठलाग अत्यंत सहजपणे केले व पाच चेंडू शिल्लक राखत 119/2 अशा धावसंख्येने विजयाला गवसणी घातली. अफगाणिस्तानच्या वतीने इमरान मीरने फक्त 14 चेंडूंत नाबाद 53 धावा कुटत संघाला बळकट सुरुवात करून दिली. त्याच्या या खेळीत 7 सिक्स आणि 2 चौकारांचा समावेश होता, ज्यामुळे अफगाणिस्तानने पूर्णपणे सामन्यात आपले वर्चस्व गाजवले.
त्यानंतर फरमानुल्लाह सफीने 7 चेंडूंत 4 सिक्सेससह नाबाद 26 धावा केल्या. कर्णधार गुलबदीन नायबनेही लक्ष्याचा पाठलाग करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आणि 6 चेंडूंत 2 सिक्सेसच्या मदतीने 17 धावा केल्या.

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका

अफगाणिस्तानने या यशस्वी प्रवासाची सुरुवात आपल्या ‘ए’ गटातील पहिल्या सामन्याने केली. येथे त्यांनी साउथ आफ्रिकेवर 3 विकेटने विजय मिळवला. या सामन्यात त्यांनी 108 धावांच्या लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केलेला. त्यानंतर अफगाणिस्तानने ओमानविरुद्ध चार विकेटने विजय नोंदवला. त्यांनी ओमानला 120 धावांवर रोखले होते आणि 5.23 षटकांत लक्ष्याचा पाठलागही केला.

अफगाणिस्तानने सेमिफायनलमध्ये स्कॉटलंडविरुद्ध 21 धावांनी सामना आपल्या नावे केला. 121 धावा केल्यानंतर त्यांनी स्कॉटलंडला 100 धावांवर रोखले. अशाप्रकारे त्यांनी फायनलमध्ये जागा मिळवली. जेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत स्पर्धेचा शेवट गोड केला.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हाँगकाँग सिक्सेस 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?

    Ans: अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.

  • Que: अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने किती धावांचे लक्ष्य गाठले?

    Ans: ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत ४ बाद ११५ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने 5.1 षटकांत 2 बाद 119 धावा करत विजय मिळवला.

  • Que: इमरान मीरने अंतिम सामन्यात किती धावा केल्या?

    Ans: इमरान मीरने अवघ्या 14 चेंडूंत नाबाद 53 धावा केल्या. त्याने सात षटकार आणि दोन चौकार लगावले.

Web Title: Hong kong sixes afghanistan beat australia win first title imran mir rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Afganistan
  • Australia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.