Hong Kong Team for Asia Cup 2025: आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, या स्पर्धेसाठी हॉंगकॉंगने (Hong Kong) आपल्या संघाची घोषणा केली आहे. यासिम मुर्तजाच्या नेतृत्वाखाली हॉंगकॉंगने २० खेळाडूंचा संघ निवडला असून, पाचव्यांदा हा संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे.
हॉंगकॉंगने यापूर्वी २००४, २००८, २०१८ आणि २०२२ च्या आशिया कपमध्ये भाग घेतला आहे. या वर्षी हॉंगकॉंगला ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे, जिथे त्यांचा पहिला सामना अफगाणिस्तानसोबत होईल. त्यानंतर ते बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळतील. जर हॉंगकॉंग संघाने लीग राऊंडमध्ये टॉप-२ मध्ये स्थान मिळवले, तर ते सुपर-४ मध्ये पात्र ठरतील.
Hong Kong, China have named a strong squad for the #ACCMensAsiaCup2025 🇭🇰
Yasim Murtaza will take on his first major assignment as skipper, with the experience of Rath, Nizakat, Babar, Aizaz and Ehsan forming the core around him. #ACC pic.twitter.com/0F2ibNJ1p2
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 22, 2025
मुख्य प्रशिक्षक कौशल सिल्वा म्हणाले की, “या दौऱ्यातून आम्ही आशिया कप २०२५ ची तयारी सुरू करत आहोत. यासाठी आम्ही २० खेळाडूंचा मोठा संघ निवडला आहे. यामुळे मला प्रत्येक खेळाडूला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. तसेच, खेळाडूंना त्यांच्या खेळात सुधारणा करण्याची, एकमेकांसोबत अधिक चांगले तालमेल साधण्याची आणि जिंकण्याची मानसिकता विकसित करण्याची चांगली संधी मिळेल.”
सिल्वा पुढे म्हणाले, “हा तयारी दौरा संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे खेळाडूंना तेथील हवामान आणि खेळपट्टीची स्थिती समजण्यास मदत होईल. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळण्याची योजना आखत आहोत आणि रात्रीच्या सरावातून मौल्यवान अनुभव मिळवणार आहोत, जो आमच्या खेळाडूंसाठी खूप फायदेशीर ठरेल. आम्ही केवळ सहभागी होण्यासाठी नाही, तर जिंकण्याच्या आणि या अनुभवाचा पुरेपूर आनंद घेण्याच्या इराद्याने आहोत.”
यासिम मुर्तजा कर्णधार, बाबर हयात (उपकर्णधार) जीशान अली (यष्टीरक्षक), नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएट्जी, अंशुमान रथ, एहसान खान, कल्हान मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक उल रहमान इक्बाल, किंचित शाह, आदिल महमूद, अनस खान, हारून मोहम्मद अर्शद, अली-हसन, शाहिद वासिफ (यष्टीरक्षक), गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद.