Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Irani Cup 2025: ईरानी कपच्या सामन्यात मैदानात जोरदार गदारोळ; धुल आणि ठाकूर भिडले,’हाणामारीचा’ Video व्हायरल

सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि रेस्ट ऑफ इंडियाचा फलंदाज यश धुल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 05, 2025 | 10:05 PM
ईरानी कपच्या सामन्यात मैदानात जोरदार गदारोळ (Photo Credit - X)

ईरानी कपच्या सामन्यात मैदानात जोरदार गदारोळ (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • धुल आणि ठाकूर भिडले
  • ईरानी कपच्या सामन्यात मैदानात जोरदार गदारोळ
  • ‘हाणामारीचा’ Video व्हायरल
Irani Cup 2025: विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात नागपूरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या ईरानी कप २०२५ च्या अंतिम सामन्यात मोठी हाणामारी होता होता वाचली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि रेस्ट ऑफ इंडियाचा फलंदाज यश धुल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली विदर्भ संघाने हा सामना ९३ धावांनी जिंकत तिसऱ्यांदा ईरानी कपचा किताब आपल्या नावावर केला.

यश ठाकूरच्या जल्लोषावरून झाला वाद

विदर्भाने रेस्ट ऑफ इंडियासमोर विजयासाठी ३६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना यश धुलने आपल्या खेळीने संघाला सामन्यात टिकवून ठेवले होते. ९२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना यश धुलने यश ठाकूरच्या चेंडूवर ऑफ स्टम्पच्या दिशेने हवेत एक फटका मारला, पण सीमारेषेवर अथर्व तायडेने त्याचा झेल टिपला.

pic.twitter.com/LwuqQrd4IA — Nihari Korma (@NihariVsKorma) October 5, 2025

IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा; रनआऊटच्या निर्णयावर मुनीबाचा नकार, कर्णधार फातिमा सना पंचांशी भिडली!

वादाचे कारण

धुलची विकेट मिळवताच यश ठाकूरने अति-आक्रमक पद्धतीने जल्लोष करायला सुरुवात केली. ठाकूरची ही कृती यश धुलला आवडली नाही आणि दोघांमध्ये मैदानातच जोरदार भांडण सुरू झाले. प्रकरण वाढताना पाहून विदर्भ संघाचे खेळाडू आणि पंचांना त्वरित मध्यस्थी करून हा वाद शांत करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

मॅच रेफरीकडून कठोर कारवाईची शक्यता

दोन्ही खेळाडू ज्या पद्धतीने लाइव्ह मॅचमध्ये भिडले, ही बाब गंभीर मानली जात आहे. मॅच रेफरी पंकज धरमाणी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोन्ही खेळाडूंवर मोठी कारवाई करू शकतात. बीसीसीआयलाही या दोन खेळाडूंवर कठोर ॲक्शन घ्यावी लागू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या भांडणाची सध्या खूप चर्चा आहे.

विदर्भाच्या नावे तिसरा ‘ईरानी कप’

या सामन्यात विदर्भ संघाने रेस्ट ऑफ इंडियाचा दुसरा डाव २६७ धावांवर संपुष्टात आणत ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ही विदर्भ संघाची तिसऱ्यांदा ईरानी कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी आहे. सामन्यात यश ठाकूरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने दोन्ही डावांत मिळून एकूण ६ बळी घेतले. पहिल्या डावात त्याने चार, तर दुसऱ्या डावात दोन विकेट्स मिळवत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

Web Title: Huge commotion on the field during irani cup match video of fight goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 10:03 PM

Topics:  

  • Rajat Patidar
  • Vidarbha

संबंधित बातम्या

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
1

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.