IND vs PAK सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा (Photo Credit - X)
IND W vs PAK W: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान वाद निर्माण झाला. ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी सलामीवीर मुनीबा अली (१२ चेंडूंत २ धावा) हिला रनआऊट (Runout) देण्यात आला. या वादग्रस्त निर्णयामुळे पाकिस्तानी संघ संतापला आणि त्यांनी पंचांशी वादही घातला, तर मुनीबा अलीने बराच वेळ मैदान सोडण्यास नकार दिला.
क्रांती देवने टाकलेल्या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हा सर्व गदारोळ झाला. मुनीबाविरुद्ध एलबीडब्ल्यूची अपील फेटाळल्यानंतर ती क्रीजच्या बाहेर पडली. त्याचवेळी दीप्ती शर्माने स्लिपमधून अचूक थ्रो केला आणि स्टंप्स उद्ध्वस्त केले. भारतीय संघाने रनआऊटची अपील केली. रनआऊटच्या रिप्लेमध्ये मुनीबाची बॅट सुरुवातीला क्रीजमध्ये दिसत होती. त्यामुळे तिसऱ्या पंचाने आंशिक रिप्ले पाहून तिला प्रथम नॉट आऊट घोषित केले. मात्र, संपूर्ण रिप्ले पाहिल्यानंतर लक्षात आले की, चेंडू स्टंपवर आदळला तेव्हा तिची बॅट हवेत होती. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी आपला आधीचा निर्णय उलटवला आणि मुनीबा अलीला बाद घोषित केले.
@cricketaakash – The wicket is about to come, After that a wicket came in the next over. What a prediction sir, I really salute you. Kranti Gaud to Muneeba Ali, THATS OUT!! Run Out!!#INDWvPAKW #ICCWomensWorldCup2025 pic.twitter.com/YPvzAS0KL1 — Asia Voice 🎤 (@Asianewss) October 5, 2025
बाद झाल्यानंतरही मुनीबा अली बराच वेळ मैदानावरील पंचांशी बोलत राहिली आणि नंतर सीमारेषेजवळ उभी राहिली. दरम्यान, पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिने थेट चौथ्या पंचांशी वाद घातला. मुनीबा अलीला बाद का देण्यात आले, याबद्दल तिने तर्क-वितर्क करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी निर्णय स्पष्ट केल्यानंतर अखेरीस परिस्थिती शांत झाली, परंतु पाकिस्तानी संघाने या निर्णयावर तीव्र असहमती दर्शविली.
क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनचा नियम क्र. ३० (Rule 30 of Playing Conditions) नुसार: